बालमणी अम्मा यांच्या ११३ व्या वाढदिवसानिमित्त गुगलने आज डूडलच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र आज गुगलने ज्यांचा सन्मान केला आहे, त्या बालमणी अम्मा कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. बालमणी अम्मा यांचा जन्म १९ जुलै १९०९ रोजी पुन्नयुरकुलम, त्रिशूर जिल्ह्यातील नालापत घरात झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मल्याळम भाषेत लिहिणाऱ्या प्रसिद्ध कवी ‘नलपत बालमणी अम्मा’ यांच्या कविता प्रेरणादायी आहेत. आज, १९ जुलै २०२२ रोजी बालमणी अम्मा यांची ११३ वी जयंती आहे. गुगलने खास डूडलच्या मदतीने त्यांची आठवण काढली आहे. कलाकार देविका रामचंद्रन यांनी हे डूडल तयार केले आहे. बालमणी अम्मा यांना मल्याळम साहित्यात ‘साहित्यिक आजी’ (Grandmother of Litreature) म्हणूनही ओळखले जाते.

Optical Illusion: ‘या’ फोटोमध्ये लपला आहे वाघ; तुम्हाला सापडला का?

बालमणी अम्मा, ज्यांना ‘मातृत्वाची कवयित्री’ म्हटले जाते, त्यांनी कुदुंबिनी, धर्ममाराथिल, श्री हृदयम, प्रभंकुरम, भावनायिल, ओंजलिनमेल, कलिकोट्टा, वेलीचाथिल यांसारख्या उत्कृष्ट कविता लिहिल्या आहेत. त्यासाठी त्यांना सरस्वती सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कार आणि एझुथाचन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्यांना भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण पुरस्कारही मिळाला. बालमणी अम्मा यांच्यावर नलपत नारायण मेनन आणि कवी वल्लाथोल नारायण मेनन यांच्या कवितांचा खूप प्रभाव होता.

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात जन्मलेल्या बालमणी अम्मा यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नाही, तरीही त्या एक महान कवयित्री बनल्या. खरं तर, बालामणी यांचे मामा कवी नलपत नारायण मेनन, यांच्याकडे पुस्तकांचा मोठा संग्रह होता, ज्यामुळे बालमणी अम्मा यांना कवी बनण्यास मदत झाली. वयाच्या १९ व्या वर्षी अम्मा यांचे व्ही.एम. नायर यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना सुलोचना, श्याम सुंदर, मोहनदास आणि प्रसिद्ध लेखिका कमला दास ही चार मुले झाली. कमला दास यांनी बालमणी अम्मा यांच्या ‘कलम’ या कवितेचा अनुवादही केला आहे, ज्यात आईच्या एकाकीपणाचे चित्रण आहे.

हा तरुण लोकांना मिठी मारून तासाला कमावतो ७ हजार रुपये! जाणून घ्या काय आहे प्रकरण

बालमणी अम्मा यांचे २० हून अधिक गद्य, अनुवाद प्रकाशित झाले आहेत. मुलांवर आणि नातवंडांवरचे त्यांचे प्रेम त्यांनी लिहिलेल्या कवितांमधून दिसून येते. त्यामुळेच त्यांना कवितेची आई आणि आजी ही पदवी देण्यात आली आहे. २००४ मध्ये अम्मा यांचे निधन झाले आणि पूर्ण सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 113rd birth anniversary of grandmother of literature google did the honor by creating a special doodle know about balmani amma pvp
First published on: 19-07-2022 at 10:45 IST