भारतात अनेक ब्युटी कॉन्टेस्ट होत असतात. या स्पर्धांमध्ये जिंकणारे स्पर्धक आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतात. नुकतंच किंग्डम ऑफ ड्रीम्स, गुडगांव येथे ‘मिस टीन दिवा २०२१’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांचा वयोगट हा १४ ते १९ वर्षे असा होता. या स्पर्धेत ११वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने बाजी मारली अजून तिला ‘मिस टीन इंटरनॅशनल इंडिया’ (Miss Teen International India 2021) हा खिताब देण्यात आला आहे.

कोण आहे ‘मिस टीन इंटरनेशनल इंडिया’ची विजेती ?

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
History made by Raj Bhagat He became first young man from Vasai to clear competitive examination
राज भगतने रचला इतिहास! वसईतून स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होणारा पहिला तरूण ठरला
jaiswal
जैस्वालला सूर गवसणार? राजस्थान रॉयल्ससमोर आज गुजरात टायटन्सचे आव्हान
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’

‘मिस टीन इंटरनेशनल इंडिया २०२१’चा खिताब जिंकणाऱ्या मुलीचं नाव आहे मन्नत सिवाच (Mannat Siwach). राजस्थानमधील जयपूर येथे राहणारी मन्नत २०२२ मध्ये होणारं सर्वांत मोठं टीन पॅजन्ट म्हणजेच मिस टीन इंटरनॅशनल २०२२ (Miss Teen International in 2022) मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल. सध्या मन्नत जयश्री पेरीवाल हाय स्कूल, जयपूर येथे ११वी इयत्तेत शिकत आहे. आर्मी परिवारात वाढलेली असल्याने अनुशासन (Self-disciplin), चिकाटी, (Perseveranc) आणि मेहनत (Diligence) हे गुण जन्मतःच मन्नतच्या अंगी भिनलेले आहेत.

मन्नत अभ्यासात फारच हुशार असून तिने अभ्यासासोबतच अनेक आंतरशालेय स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली आहेत. याव्यतिरिक्त तिने बास्केटबॉल आणि बॅडमिंटनच्या जिल्हा स्तरीय स्पर्धांमध्येही अनेक पारितोषिकं जिंकली आहेत. हे ब्युटी पॅजन्ट जिंकल्यानंतर सोशल मीडियावर लोकं तिचं ‘ब्युटी विथ ब्रेन’ या नावाने कौतुक करत आहेत.

मन्नतच्या यशाची गुरुकिल्ली

मन्नतने एका मुलाखती दरम्यान सांगितले की ती बाल शोषणाच्या (Child abuse) विरोधात आहे. जर आपल्याला स्वतः वर विश्वास असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो या म्हणीवर मन्नतचा ठाम विश्वास आहे. लॉकडाउनच्या काळात तिने आपल्या मित्र-मैत्रिणींच्या मदतीने ‘जुनून’ नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट सुरु केलं. लोकांना आपल्या क्षमतांनुसार आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळावी हा या अकाउंटचा हेतू आहे.

मन्नतने आपल्या यशाचे श्रेय ‘मिस टीन दिवा ऑर्गनायझेशन’ला दिले आहे. ती म्हणते, ‘आज मी जे काही आहे ते फक्त ‘मिस टीन दिवा ऑर्गनायझेशन’मुळे आहे. त्यांनी आम्हाला आकार दिला. जरी ते आमच्यासोबत ३ तास असतील किंवा फक्त कॉल-मेसेजवर आमच्याशी बोलत असतील, त्यांनी नेहमीच आम्हाला प्रोत्साहन दिले आहे. तसेच ब्युटी क्वीन (Beauty queen) बनण्याच्या माझ्या स्वप्नांमधील अडथळ्यांना त्यांनीच दूर केलं आहे.’

‘मिस टीन दिवा २०२१’ या स्पर्धेत बंगळुरूच्या ब्रुंडा येराबली ने ‘मिस टीन यूनिवर्स इंडिया’ (Miss Teen Universe India), गुडगांवच्या राबिया होरा हिला मिस टीन अर्थ इंडिया (Miss Teen Earth India), तर कोलकात्याच्या माहिका बियाणी हिला मिस टीन मल्टीनेशनल इंडिया (Miss Teen Multinational India) खिताबाने गौरवण्यात आलं.