विमानतळ म्हटल्यावर सर्वात आधी डोक्यात येतात ते ड्युटी फ्री प्रोडक्ट. बाहेरील किंमतीपेक्षा स्वस्तात मिळणाऱ्या वस्तूंचे अनेकांना आकर्षण असते. मात्र सध्या दुबई विमातळावर ड्युटी फ्री प्रोडक्टबरोबरच आणखीन एका खास गोष्टीचे आकर्षण आहे आणि ती गोष्टमध्ये २० किलो सोन्याची वीट ठेवलेली काचेची पेटी. विशेष म्हणजे तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये दुबईला जात असाल तर ही सोन्याची वीट तुम्ही जिंकू शकता. अगदी थोडेश्या प्रयत्नांनी तुम्ही खरोखरच कोट्याधीश बनू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुबई विमानतळावरील २० किलो सोन्याची वीट जिंकण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे. हे २० किलो सोने वीटेच्या स्वरुपात एका बॉक्समध्ये ठेवण्यात आले आहे. ती वीट यशस्वीरित्या या काचेच्या बॉक्सबाहेर काढणारी व्यक्ती ती २० किलो सोन्याचे वीट घरी घेऊन जाऊ शकते. दुबई विमानतळावरील या स्पर्धेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस ती सोन्याची विट बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. २० किलो वजनाची वीट बॉक्स बाहेर काढणे हे सोपे काम नाही. कारण काचेच्या बॉक्सला एक छोटे वर्तुळाकार छिद्र असून त्यामधून एकावेळी एक हात आतमध्ये टाकता येतो. अगदी ९० अंशात हात काचेच्या पेटीत टाकून ही २० किलोची वीट उचलून ती बाहेर काढण्याचा प्रयत्न लोक करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. ही वीट कशी काढावी यासाठी अनेकांनी शक्कल लढवत आहेत. तरी कोणाच्याही प्रयत्नांना अद्याप यश मिळाले नाही.

दुबई विमानतळावरील ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. ही स्पर्धा सध्या विमानतळावरील सर्वांसाठीच आकर्षण बनले आहे. तर मग कधी जाताय दुबईला आपले नशिब आजमावण्यासाठी?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 kg gold bar lifting challenge at dubai international airport
First published on: 28-03-2019 at 17:23 IST