आजच्या धावपळीच्या या जीवनात जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर या वयात तुम्हाला अधिक विश्रांती घ्यायला आवडेल अन्यथा काहीही शिकण्याची आणि शिकवण्याची इच्छा देखील होत नसते. अशातच जर तुमच्याकडे काही शिकण्याची इच्छा आणि जिद्द असली तर कोणत्याही वयात तुम्ही काहीही साध्य करू शकता. वय तुमच्यासाठी फक्त एक संख्या आहे. त्यातच आपण नेहमीच ऐकतो की, कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. तसेच शिकण्याकरिता तुमच्या मनात उत्साह असला की तुम्ही कोणत्याही वयात शिकू शकतात. असेच मध्य प्रदेश मधल्या देवास येथील रेशम बाई तंवर या ९० वर्षाच्या आजीबाईंनी हे सत्य सिद्ध केले आहे. चक्क वयाच्या ९० व्या वर्षी कार चालवायला शिकल्यानंतर त्या आज प्रेरणादायी आजी बनल्या आहेत.

जेव्हा ९० वर्षाची आजी बाई महामार्गावर कार चालवताना दिसल्यावर आपल्या तोंडातून एकाच शब्द निघतो की जर उत्साह,जज्बा आणि जिद्द असेल तर या आजीबाईंसारखा असावा. रेशम बाई तंवर या आजी मूळच्या मध्य प्रदेश येथील देवास येथे राहणार्‍या आहेत. तर त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी कार चालवायला शिकल्या. या आजींचा कार चालवण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिला आणि त्यांनी या आजींना प्रेरणादायी आजी म्हंटले आहे.

कुटुंबातील प्रत्येकाला कार चालवताना पाहून कार चालवण्याचा विचार आजींच्या मनात आला

देवास जवळील बिलावली गावात रेशम बाई या आजी एकत्र कुटुंबात राहतात. त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्याला कार चालवता येत होती. प्रत्येकाला कार चालवताना पाहून आजी बाईंनीही गाडी चालवण्याचा विचार केला आणि आपल्या मुलाला कार शिकवायला सांगितले. यानंतर या आजीच्या मुलाने आईची आवड पाहून गाडी शिकवायला सुरुवात केली. काही दिवसातच आजी कार चालवायला शिकल्या. दरम्यान आजींचा कार चालवण्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कार चालवण्याच्या व्हिडीओवर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी ट्वीट केले आणि म्हटले की, ”आजीने आपल्या सर्वांना आमच्या आवडीनिवडींसाठी प्रेरित केले आहे. वयाची बंधने नाहीत. तुमचे वय कितीही असो, तुम्हाला आयुष्य जगण्याची आवड असली पाहिजे.”

तर आजी या वयातही त्यांची स्वतःची सर्व कामे स्वतः करतात.