Viral Video : नव्वदच्या दशकातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बालपण आणि त्यावेळीच्या गमती जमती आजही प्रत्येकाला आठवत असेल. त्या काळचे खेळ, खाऊ, टिव्हीवरील कार्यक्रम, जाहिराती आजही मनात घर करून आहे. सोशल मीडियावर नव्वदच्या दशकातील एखादी गोष्ट व्हायरल झाली तर लगेच जुने बालपणीचे दिवस आठवतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांचे बालपण आठवू शकते. कारण या व्हिडीओमध्ये तीन बहिणींनी सर्वांना बालपणीची आठवण करून दिली आहे. तुम्हाला वाटेल या तरुणींनी नेमकं केलं काय, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या तीन बहिणी नव्वदच्या दशकातील जाहिराती म्हणताना दिसत आहे. त्या सुरात त्यावेळी गाजलेल्या काही जाहिराती म्हणत आहे. त्यांच्या जाहिराती ऐकून तुम्हाला तुमचे बालपणीचे दिवस आठवतील. व्हिडीओमध्ये तरुणी विको, सौंदर्य साबुण निरमा, वॉशिंग पावडर निरमा, सारख्या प्रसिद्ध जाहिरातीचे टायटल गाणी गाताना दिसताहेत. त्या इतक्या सुंदर पणे जाहिराती म्हणतात की तुम्हीही अवाक् व्हाल. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी या जाहिराती पाहिल्या असतील.या जाहिराती पाहून नव्व्दच्या दशकातील मुले लहानाचे मोठे झाले त्यामुळे अनेकांना या जाहिराती पाठांतरसुद्धा असू शकतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : माणुसकी हाच खरा धर्म! उबर ड्रायव्हरच्या मुलीसाठी विकत घेतली स्कूल बॅग; नेटकरी म्हणाले, ” “जगाला तुझ्या सारख्या माणसांची गरज …”

_soumya__srivastava या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भारतीय जाहिराती” या व्हिडीओवर ५ लाखांहून अधिक लाइक्स आले असून या अनेक युजर्सनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला. अनेक युजर्सना जुन्या दिवसांची आठवण आली. एका युजरने लिहिलेय, ” ते किती सुंदर दिवस होते” तर एका युजरने लिहिलेय, “ही खूप हटके रील आहे” काही युजर्सनी अशा आणखी काही जाहिरातींचा उल्लेख केला आहे.