आजी आणि नातवंडाचं नातं काही औरच असतं…आजी-आजोबा म्हटलं की प्रेम, शिस्त आणि संस्कारांचं बहरलेलं झाड असतं. राजा-राणीच्या गोष्टी सांगणारी आजी आपण आतापर्यंत पाहत आलो आहोत…पण नातीसोबत ठेका धरणारी ९३ वर्षीय आजी सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होतेय. आजी आणि नातीची ही जोडी त्यांच्या जबरदस्त डान्सने लोकांचं मन जिंकत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येकच आजी-आजोबांसाठी त्यांची नातवंडे म्हणजे दुधावरची सायच असते. नातवंडं झाली म्हणून आजी आजोबा आनंद साजरा करतात. नातवंडाची स्वप्ने पूर्ण व्हावीत म्हणून आजी-आजोबा नेहमीच प्रयत्नशील असतात. आजींनी आपल्या लहानपणी दिलेल्या प्रेमासारखंच त्यांच्या उतारवयात ही तितकंच प्रेम देण्याचा प्रयत्न नातीने केला असून रिक्रिएट डान्स व्हिडीओ लोकांना खूपच भावलाय.

या व्हिडीओमध्ये सुरूवातीला नात अ‍ॅलिसन  क्रॉस जेव्हा लहान होती त्यावेळी तिला कडेवर घेऊन मेरी फ्रान्सिस ओब्रायन या आजी डान्स करताना दिसून येत आहेत. सुरूवातीला ही खूप जुनी क्लिप दिसून येते. त्यानंतर पुढच्या नव्या क्लिपमध्ये पहिल्या क्लिपमधली छोटी नात जेव्हा मोठी होते तेव्हा ती आजीला कडेवर घेऊन डान्स करताना दिसून येतेय.

गुड मॉर्निंग अमेरिका नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा ९३ वर्षीय आजी आणि नातीचा हा स्पेशल रिक्रिएट डान्सचा व्हिडीओ शेअर केलाय. ओब्रायन आजीने गेल्या जुलै महिन्यापासून तिच्या 33 वर्षीय नात अ‍ॅलिसन  क्रॉससह डान्सचे अनेक व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा : इतक्या भयंकर अपघातातून वाचणं शक्यच नव्हतं, पण…! चमत्कारिक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा : एका ग्लासमुळे नवऱ्याची झाली ‘अशी’ फजिती, पाहा व्हिडीओ!

आजी-नातीचा हा स्पेशल रिक्रिएट डान्स पाहून तुम्ही काहीसे भारावून जाल, पण असे तुम्ही एकटे नाहीत. हा व्हिडीओ १५ सप्टेंबर रोजी शेअर केल्यापासून या क्लिपला पाच हजाराहून जास्त व्ह्यूज आणि अनेक कमेंट्स मिळाले आहेत. नेटिझन्सना हा इमोशनल व्हिडीओ खूपच आवडला आहे. नातीने तिच्या आजीबरोबर रिक्रिएट केलेल्या या सुंदर क्षणांना पाहून चेहऱ्यावर स्माइल आल्याशिवाय राहत नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: year old grandma and granddaughter recreate heartwarming dance moment in viral tiktok video prp
First published on: 16-09-2021 at 22:36 IST