रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांकडे दुर्लक्ष करतो. तुमचा आजचा दिवस सार्थकी लावेल असा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एक वाहतूक पोलिस कर्मचारी आणि गोंडस भडका कुत्रा यांच्यातील मैत्रीचा सुंदर क्षण दाखवला आहे. ब्लू क्रॉस ऑफ इंडियाने इंस्टाग्रामवर शेअर केलेली हा हृदयस्पर्शी व्हिडीओ एक आनंददायी क्षण दर्शवते. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटेल.

व्हिडिओमध्ये व्यस्त वाहतूक पोलिस कर्मचारी एका रहदारी असलेल्या रस्त्यावर उभा आहे. नेहमीप्रमाणे तो रहदारीचे नियंत्रण करताना दिसत आहे. पण त्याच्याबरोबर एक भटका कुत्रा दिसत आहे जो वाहतूक कर्मचाऱ्याच्या अवती भोवती फिरतो आहे. आनंदाने उड्या मारतो आहे. इकडे तिकडे धावत आहे. काहीही करून वाहतूक पोलिसाचे लक्ष स्वत:कडे वेधण्याचा प्रयत्न करत आहे. वाहतूक पोलिस शांतपणे रहदारी नियंत्रित करण्याचे काम करत आहे. वाहतूक पोलिस ज्या दिशेला चालत जाईल त्या दिशेला कुत्रा जातो आहे. शेवटी तो वाहतूक पोलिसाचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतो पण वाहतूक पोलिस त्याच्याशी प्रेमाने संवाद साधताना दिसत आहे. व्हिडीओने नेटकऱ्यांनी मन जिंकले आहे. खेळकर कुत्रा आनंदीपणे खेळत आहे तर दयाळू वाहतूक पोलिस त्याच्याशी प्रेमाने वागतो आहे. वाहतूक पोलिस आणि भटक्या कुत्रा यांच्या मैत्रीचा सुंदर क्षण पाहून काही लोक भारावून गेले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A busy traffic cop his furry friend and a lot of love viral video is a must watch snk
First published on: 24-05-2024 at 13:31 IST