scorecardresearch

ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून जेवण घेण्यास दिला नकार; सोशल मीडियावर झाला मेसेज व्हायरल

तेलंगणामध्ये ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडे आपले जेवण न पाठवण्याच्या कडक सूचना रेस्टॉरंटला दिल्या, हे प्रकरण व्हायरल झाल्यावर यूजर्सनी संताप व्यक्त केला आहे.

ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून जेवण घेण्यास दिला नकार; सोशल मीडियावर झाला मेसेज व्हायरल
photo(social media)

अन्नाला कोणताही धर्म नसतो असे म्हणतात.. पण आजच्या जगात काही लोकं याकडे देखील धर्माच्या नजरेने पाहू लागले आहेत. याची अनेक प्रकरणे आपल्याला इंटरनेटवर दररोज पाहायला मिळतात. असेच एक प्रकरण हैदराबाद मधून समोर आले आहे. जिथे एका व्यक्तीने रेस्टॉरंटला निर्देश दिले की कोणत्याही मुस्लिम डिलिव्हरी बॉयने त्यांचे जेवण पोहोचवू नये.

शेख सलाउद्दीन, अध्यक्ष, तेलंगणा राज्य टॅक्सी आणि ड्रायव्हर्स JAC यांनी ग्राहकाने दिलेल्या सूचनांचे स्क्रीनग्राब शेअर केले आणि स्विगीला अशा विनंतीविरुद्ध भूमिका घेण्याची विनंती केली आहे. शेख सलाउद्दीन नावाच्या युजरने एक फोटो ट्विट करून लिहिले की, ‘Swiggy कृपया एवढ्या मोठ्या विनंतीविरुद्ध भूमिका घ्या. डिलिव्हरी बॉयचे काम अन्न पोहोचवणे हे आहे, मग ते हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख असो.

( हे ही वाचा: Anand Mahindra tweet: आनंद महिंद्रा यांनी गणेशोत्सवानिमित्त शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच, दिवस आनंदात जाईल)

या वर्षाच्या सुरुवातीला देखील मध्य प्रदेशातही असेच एक प्रकरण समोर आले होते. झोमेटो या फूड अॅपने अन्नाला कोणताही धर्म नसतो, असे सांगत कठोर भूमिका स्वीकारली होती. यानंतर झोमॅटोच्या या कामाचे सर्वत्र कौतुक झाले. ही लिहिपर्यंत शेकडो लोकांनी या फोटोला रिट्विट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

( हे ही वाचा: रिपोर्टरने जानेवारीचे स्पेलिंग विचारताच शिक्षिकेने जे उत्तर दिले ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा Viral Video)

एका युजरने फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘अशा लोकांचा आदेश स्वीकारू नये.’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘हे अतिशय लज्जास्पद आहे आणि याचा तीव्र निषेध केला पाहिजे.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘अन्नाला कोणताही धर्म नसतो.’ याशिवाय इतर अनेक युजर्सनी यावर कमेंट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A customer refuses to take food from a muslim delivery boy people got angry on twitter gps

ताज्या बातम्या