Anand Mahindra tweet: भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा इंटरनेटवर खूप सक्रिय असतात. ते दररोज ट्विटरवर काही ना काही शेअर करत असतात. त्‍यामुळे त्यांच्या चाहत्यांना दररोज काही ना काही मजेदार, रंजक आणि प्रेरणादायी गोष्टी पाहायला मिळतात. त्यांनी शेअर केलेल्या प्रत्येक व्हिडीओ किंवा मजकूर अनेकांना आवडतो. यावेळीही आनंद महिंद्रा यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून गणेश भक्तांना खूप आनंद झाला आहे.

खरं तर, आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर महिंद्रा ट्रकची जाहिरात केली आहे, ज्यामध्ये एक ट्रक चालक बाप्पाला घरी घेऊन जात आहे. या दरम्यान तो गणपतीकडे आईच्या तब्येतीची, मुलीच्या शिक्षणाची आणि बायकोची तक्रार करताना दिसतोय. तसंच वाटेत मित्राप्रमाणे बाप्पाशी बोलत त्याला घेऊन घरी पोहोचतो.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Chef Vishnu Manohar Prepares 10000 Kg Misal To Mark Mahatma Phule Jayanti
शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली १० हजार किलोंची मिसळ; अजित पवार अन् चंद्रकांत पाटलांनीही मारला ताव, पाहा Video
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…

(हे ही वाचा: Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांचा नितीन गडकरींना थेट सवाल; मी बोगद्यातून जाणं पसंत करेन पण…)

येथे व्हिडीओ पहा

( हे ही वाचा: VIRAL VIDEO :तुम्ही कधी झोम्बी किडा पाहिला आहे का? नसेल, तर या भयानक कीटकाचा व्हिडीओ एकदा पहाच)

हा मनमोहक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले, भारताच्या गणेश चतुर्थीतील एक कथा..! ट्वीट शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांत या व्हिडीओला पन्नास हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

एका वापरकर्त्याने लिहिलंय, ‘एक हृदयस्पर्शी जाहिरात, निर्माते आणि ज्यांनी ते बनवले त्यांचे अभिनंदन.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘कुणीच्या लक्षात आलं का, की बाप्पाने सीट बेल्ट लावला आहे.’ दुसरीकडे, दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘गणेश चतुर्थीचा सर्वोत्कृष्ट व्हिडीओ..! याशिवाय इतर अनेक यूजर्सनी यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.