Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मद्यपी शिक्षकाने शर्टाच्या खिशात चक्क शाळेत दारूची बॉटल आणल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
शाळा हे विद्येचे माहेरघर असते. अनेक विद्यार्थी येथे ज्ञान संपादन करायला येतात. अशा ठिकाणी मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार मिळावे, अशी अपेक्षा प्रत्येक पालकांची असते पण दारू पिऊन शाळेत हजेरी लावलेल्या या शिक्षकाचा व्हिडीओ पाहून कोणालाही संताप येईल.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका शिक्षकाचा संतापजन प्रकार दिसून येईल. या शिक्षकाने चक्क दारू पिऊन शाळेत हजेरी लावली आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की शिक्षकाच्या शर्टच्या खिशात एक दारूची बाटली आहे. जेव्हा व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने या शिक्षकाला दारूच्या बाटली विषयी विचारले तेव्हा शिक्षक ही दारूची बाटली हाताने लपवताना दिसतो.त्यानंतर तो व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीबरोबर वाद घालतो. “मी रोज पितो. तुम्हाला कोणती समस्या आहे का?” असं उलट बोलताना हा शिक्षक दिसतो.
व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसेल की हा शिक्षक शाळेतील शिक्षकांच्या कक्षेत जातो आणि टेबलासमोर बसतो. टेबलावर दारूची आणि पाण्याची बाटली ठेवतो आणि बाटलीत दारू आणि पाणी ओततो.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक जणांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा : वडिलांचे प्रेम! लाडक्या लेकीला नवरीच्या रुपात पाहून भावूक झाले वडील, मुलीवर केला कौतुकाचा वर्षाव; नेटकरी म्हणाले, “एवढं कौतुक फक्त वडिलच…”

Sudhir Mishra या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शिक्षकाला कामावरून काढेपर्यंत ही पोस्ट रिपोस्ट करा
शाळेत दारू पिऊन येत हा शिक्षक मुलांच्या भविष्याशी खेळत आहे. छत्तीसगडच्या बिलासपूर येथील या शिक्षकाचे नाव संतोष केवट आहे.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा शिक्षक विद्येचे मंदिर दुषित करतोय. मुलांचा हा गुन्हेगार आहे. त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी.” तर एका युजरने लिहिलेय, “अतिशय लज्जास्पद” आणखी एका युजरने लिहिलेय, “अशा शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय होईल?”