Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. सोशल मीडियावर अनेक विचित्र व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. काही लोक नवनवीन भन्नाट जुगाड शोधताना दिसतात तर काही लोक नवनवीन हटके रेसिपी दाखवतात. सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी नवीन पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओध्ये नवरदेव नवरीचे चेहऱ्यावरील घूंगट उचलताना दिसत आहे. पण पुढे जे काही घडते ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. घूंगट उचलल्यानंतर नवरदेवाला जे काही दिसते, ते पाहून तो जागेवरून उठतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडले?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका सोफ्यावर नवरदेव आणि नवरी बसलेले दिसतात. पुढे व्हिडीओत नवरदेव नवरीच्या चेहऱ्यावरील घूंघट उचलतो. घूंघट उचलल्यानंतर दिसते की नवरीच्या पोशाखात नवरी नाही तर एक तरुण मुलगा आहे. हे पाहून नवरदेवाला चांगलाच धक्का बसतो. नवरेदव डोक्यावरील टोपी काढतो आणि तरुणाला बेदम मारहाण करतो. नवरीच्या पोशाखात असलेला तरुण त्याला हसत हसत आवरतो. पुढे व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की हा एक प्रँक व्हिडीओ आहे. शेवटी व्हिडीओत नवरदेवासह इतर त्यांच्या आजुबाजूला बसलेले लोक सुद्धा हसताना दिसतात. सोशल मीडियावर प्रँकचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण हा भन्नाट व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसू आवरणार नाही.

हेही वाचा : VIDEO : करीना कपूरला पाहताच महिलेनी केले असे कृत्य…; व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : उष्णतेमुळे तहानलेला उंट रस्त्यावर पडला; ट्रक चालक देवदूत बनून आला अन्… पाहा VIDEO

Sitaram Meghwanshi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “असं कोण करतं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बिचाऱ्याच्या भावनांचा विचार करा” तर एका युजरने लिहिलेय, “दिल के अरमान आंसुओ में बह गए” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाचला नवरदेव, हा तर प्रँक होता” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.