दुसऱ्यांसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणारे खूप कमी लोक या जगात आहेत. ‘मी माझं बघतो, मला दुसऱ्यांचं काय करायचं आहे?’ अशी मानसिकता असणारे अनेक लोक आहेत. पण या जगात काही लोक आहेत जे माणुसकीसाठी आपला जीवही धोक्यात घालतात. चीनमधल्या एका कंडक्टरने दिव्यांग महिलेला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. प्रसंगावधानता दाखवत रेल्वेखाली येण्यापासून त्याने तिला वाचवलं खरं पण यात त्याला आपला उजवा पाय कायमचा गमवावा लागला.
वाचा : मुंबईतील ‘या’ कंपनीमध्ये मासिक पाळीची मिळते विशेष रजा
चीनमधील ‘CGTN’च्या वृत्तानुसार स्यू हे ६ जुलैच्या संध्याकाळी ट्रेनने प्रवास करत होते. यावेळी एक महिला रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात होती. मोटारमनने हॉर्न वाजवून तिला सावध करण्याचा प्रयत्न केला. पण ती मात्र पुढे चालतच राहिली. अनेकदा हॉर्न वाजवूनही ती हटत नाही हे दिसताच काहीतरी गडबड असल्याचं स्यू यांच्या लक्षात आलं. तिला ऐकू येत नसल्याचं त्यांना कळलं. ही महिला रुळावरून बाजूला झाली नाही तर नक्कीच तिचा अपघात होईल हे त्यांना कळून चुकलं. तिला वाचवण्यासाठी त्यांनी इमर्जन्सी ब्रेकही मारले पण तोपर्यंत उशीर झाला होता. तेव्हा तिला वाचवण्यासाठी त्यांनी चालत्या ट्रेनमधून खाली उडी मारली आणि धावात जाऊन तिला रूळावरून बाजूला ढकललं. त्यांनी तिला वाचवलं खरं पण या प्रयत्नात ते स्वत:ला सांभाळू शकले नाहीत. त्यांच्या उजव्या पायावरून ट्रेन गेली, त्यांना आपला उजवा पाय कायमचा गमवावा लागला. पण याच दु:ख आपल्याला नाही, असंही ते म्हणाले. पाय गमवावा लागण्यापेक्षा एकाचा जीव वाचला हे जास्त महत्त्वाचं आहे असं स्यूने अभिमानाने सांगितलं.
VIDEO : नागपूरच्या त्या तरूणांचे मृत्यूपूर्वीचे फेसबुक लाईव्ह