Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते. लहान मुले कधी काय बोलतील, हे सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा चिमुकला एका कार्यक्रमात सांगतो की बाबांची नऊ लग्न करायची आहे. चिमुकल्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (a little child told funny answers of questions, video viral)

नितीन गवळी “खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रम” गावोगावी आयोजित करतात. सोशल मीडियावर त्यांच्या कार्यक्रमातील गमती जमतीचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. त्यांच्या एका कार्यक्रमातील असाच हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका चिमुकल्याबरोबर मजेशीर संवाद साधताना दिसत आहे. चिमुकल्याने दिलेली उत्तरे ऐकून कोणीही थक्क होईल.

हेही वाचा : धोनीला विमानात पाहताच प्रवाशाने गुपचूप बनवला क्यूट Video; चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी म्हणाले, “आजचा सर्वात…”

या व्हायरल व्हिडीओ “खेळ पैठणीचा” या कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये नितिन गवळी एका चिमुकल्याबरोबर बोलताना दिसत आहे.

नितिन गवळी : मम्मीच लग्न झाल का?
चिमुकला : झालं की…
नितिन गवळी : आणि पप्पाचं?
चिमुकला : नाही झालं?
नितिन गवळी : पप्पाचं लग्न नाही झालं? मग कधी होणार आहे?
चिमुकला : करतील पुढच्यावर्षी..
नितिन गवळी : पप्पाचे किती लग्न करायची आहे?
चिमुकला : नऊ
नितिन गवळी : का बरं?
चिमुकला : एकच नवरी भेटली त्यांना
नितिन गवळी : तुला किती लग्न करायचे आहे?

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : क्युट शेफ! आजीबाईंनी कविता सादर करत बनवला ‘असा’ बर्गर की, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल फॅन

चिमुकला : एकच
नितिन गवळी : मम्मीच्या लग्नाच्या वेळेस तु कुठे होता?
चिमुकला : तिच्या पोटात
नितिन गवळी : तुला कोणी सांगितलं?
चिमुकला : मला सगळं कळतं..
नितिन गवळी : सगळं म्हणजे काय कळतं?
चिमुकला : सगळ्याचं सगळं कळतं..
नितिन गवळी : अरे बापरे घरी गेल्यावर कळतं तुला

नितिन गवळ आणि चिमुकल्याचा गोड संवाद ऐकून व्हिडीओमध्ये महिला पोट धरून हसताना दिसत आहे. हा मजेशीर व्हिडीओ तुम्हालाही आवडेल.

ni3gavali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मला सगळं कळतं”