Bycycle Bill Viral Photo:सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यापैकी काही लोकांना हसवतात, काही व्हिडीओ लोकांना विचार करायला लावतात तर काहींना त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारे व्हिडीओ आपलं लक्ष वेधून घेतात. नुकतंच एका व्यक्तीनं १८ रूपयांत सायकल खरेदीचं तब्बल ८८ वर्षांचं जुनं बिलं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. सायकलची एवढी कमी किंमत पाहून लोकांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोमधील व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ‘आत्माराम भिडे’ यांच्यासारखा काळ आठवलाय. हे बिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

जुने बिल पाहून धक्काच बसला!

संजय खरे नावाच्या युजरने त्यावर लिहिलेल्या तारखेनुसार १९३४ चे सायकलचे बिल फेसबुकवर शेअर केले आहे. सायकलची किंमत बिलात १८ रुपये लिहिली आहे. ज्या दुकानातून ही सायकल १८ रुपयांना विकली गेली, ते दुकान कोलकाता येथे असून ‘कुमुद सायकल वर्क्स’ असे त्या दुकानाचे नाव आहे. बिलावर दुकानदाराची स्वाक्षरीही दिसून येते. त्याने बिलाच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, एकेकाळी ‘सायकल’ हे माझ्या आजोबांचे स्वप्न असावे. तेव्हाची सायकल म्हणजे जणू आत्ताची व्हीआयपी गाडीच. त्या काळात सायकल असणे म्हणजे मान, सन्मान आणि प्रतिष्ठा. मात्र, आत्ताचा काळ फार बदललाय. सायकलच्या चाकाप्रमाणे काळाचे चक्र देखील फिरले आहेत. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

जुन्या आठवणींना उजाळा देत नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९३४ चं त्या काळातील बिल जुन्या आठवणींना उजाळा देते. ‘ते’ जुने दिवसं आठवून नेटकरी म्हणाले, काय ते दिवस, काय तो काळ आणि काय त्या आठवणी सर्व काही अविस्मरणीयच. त्या काळी ‘सायकल’ विकत घेणे म्हणजे स्वप्नंच असायचं. याशिवाय अजय नावाच्या युजरने दावा केला की, तेव्हाच्या तुलनेत आजचा काळ फार महाग आहे. तेव्हा सरकारी मेकॅनिकचा पगार १२ रुपये, मुख्य लिपिकाचा पगार २० रुपये आणि कलेक्टरचा पगार ५० रुपये होता. खरंच जुनं ते सोनं होतं.