आजकाल अनेक लोक बाहेर फिरायला जातात तेंव्हा त्यांच्या मनात विविध साहसी अ‍ॅक्टिव्हिटी करण्याचे विचार येतात. मग साठी ते कधी अवघड डोंगरावर चढतात, तर कधी उंचावरून पाण्यात उडी मारतात. अशा साहसी अ‍ॅक्टिव्हिटी करायला तरुणाईला खूप आवडतं परंतु या अ‍ॅक्टिव्हिटी जितक्या रोमांचक वाटतात तितक्याच त्या धोकादायक ठरु शकतात. कारण अशा अ‍ॅक्टिव्हिटी करताना अनेकांना मोठ्या अपघातालाही बळी पडावं लागण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तीन महिला उंच डोंगरावर उभ्या राहिल्याचं दिसत आहे. यावेळी त्या एका ठिकाणी थांबून पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला एक महिला पाण्यात उडी मारण्यासाठी पुढे जाताना दिसत आहे. यावेळी ती खूप उत्साहात असल्याचंही पाहायला मिळत आहे. पण ज्यावेळी ती पुढे जाऊन पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिचा पाय घसरल्यामुळे ती खोल पाण्यात खूप वाईटरित्या पडते.

A hungry tiger preys on a baby deer
वाघाची हुशारी पाहून तुम्हीही व्हाल चकित, हरणाच्या पिल्लाला झटक्यात काढलं शोधून; पाहा VIDEO
a young man was saved due to wearing helmet
VIDEO : हेल्मेट घातले म्हणून वाचला; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
a man cracking coconut with his head shocking video goes viral
धक्कादायक! डोक्यावर नारळ फोडले अन् पुढच्या क्षणी खाली पडला, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
man riding on bull viral video
बापरे! भररस्त्यावर तरुण झाला रेड्यावर स्वार! व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण…

हेही वाचा- “आई मला माफ कर…” कर्जाच्या बोजामुळे व्यावसायिकाची आत्महत्या, भावाला शेवटचा VIDEO कॉल करुन नदीत उडी मारली

व्हिडीओत दिसत आहे की, महिला खूप जोरात खाली पडते, शिवाय यावेळी महिलेच्या मागे उभ्या असलेल्या अन्य दोघींना चांगलाच धक्का बसल्याचंही पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांना त्यांच्या मैत्रिणीला मदत करण्यासाठी पुढे देखील जाता येत नाही. कारण त्या ज्या ठिकाणी उभ्या आहेत ती जागा खूप धोकादायक असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांची इच्छा असूनही त्यांना नाईलाजास्तव एका जागी उभं राहून सर्व प्रकार पाहावा लागत आहे.

मात्र डोंगरावरुन पाय घसरुन पडलेल्या महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय हा व्हिडीओ अतिउत्साही लोकांसाठी एक धडा असल्याच्या कमेंट नेटकरी करत आहेत. हा व्हिडिओ kookslams नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ५ कोटी ८० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत असल्याचं पाहायला मिळत आहे.