कौटुंबिक हिंसाचाराची अनेक प्रकरणे तुम्ही पाहिली असतील. याला राजकारणारत वावरणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वाटेलाही असे प्रसंग येत असतात. याचं ताजं उदाहरण देणारा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये आपच्या एका महिला आमदाराला तिच्या पतीने सर्वांसमोर कानशिलात लगावली आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरकार महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलत असते, त्यांच्यासाठी धोरणं आखत असते. पण सरकारमधल्याच एका महिला आमदारसोबत कौटुंबिक हिंसाचार झालेला समोर आलाय. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पंजाबमधला आहे. इथल्या आम आदमी पक्षाच्या महिला आमदार बलजिंदर कौर यांना त्यांच्या पतीने रागाच्या भरात सर्वांसमोर कानशिलात लगावलेली दिसत आहे. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या इतरांनी त्यांच्या पतीला असं करण्यापासून रोखलं. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ १० जुलैचा आहे. ५० सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरलाय. आमदारावर पतीने केलेल्या मारहाणीची संपूर्ण घटना त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेबाबत बलजिंदर कौर आणि त्यांच्या पतीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आणखी वाचा : Aishwarya Rai ची डुप्लिकेट तुम्ही पाहिलीय का? या VIRAL VIDEO ला २४ मिलियन व्ह्यूज

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : शिक्षणमंत्र्यांनी सांगितले दारू पिण्याचे फायदे; म्हणतात, “पाणी मिसळून प्यायल्यास औषध बनतं…”

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार असलेल्या पत्नीवर हात उगारलेल्या पतीवर सर्वत्र टीका होत आहे. बलजिंदर कौर या भटिंडाच्या विधानसभा मतदारसंघातील तलवंडी साबो येथून आम आदमी पक्षाच्या आमदार आहेत. त्यांच्या कुटुंबात काही कारणावरून वाद सुरू होता आणि त्यातूनच हा सगळा वाद झाला. मात्र, या घटनेमागचे खरे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आणखी वाचा : हे काय? मॉलमधून सामान चोरत होते आजी-आजोबा, अशी झाली पोलखोल आणि मग…, पाहा VIRAL VIDEO

दुसरीकडे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप बाजवा म्हणाले की, हा अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा व्हिडीओ आहे. ही निश्चितच कौटुंबिक बाब असून त्यांनी ती कुटुंबातच सोडवली पाहिजे, असे ते म्हणाले, परंतु निवडून आलेल्या महिला आमदार अशा परिस्थितीतून जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.

आणखी वाचा : फ्लाइट अटेंडंटने रडणाऱ्या लहान मुलाला शांत केलं…बाळाचा गोंडस VIDEO VIRAL

असा मुद्दा उपस्थित करत बाजवा यांनी आप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘आप’ राज्यात महिला सक्षमीकरणाच्या आश्वासनावर आली आहे, सरकार म्हणून त्यांनी ती सोडवावी आणि राज्यातील अशा घटनांमुळे राज्यातील तरुणांची चुकीची प्रतिमा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap mla baljinder kaur slapped by husband in punjab video goes viral on social media prp
First published on: 02-09-2022 at 15:56 IST