एअर इंडियाच्या विमानात चक्क एसी बंद असल्याने विमानातल्या प्रवाशांना बडोदा ते दिल्ली असा उकाड्यातच प्रवास करावा लागला. उकाड्याने हैराण झालेल्या या प्रवाशाने सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला. एअर इंडियाचे AI-880 हे विमान रविवारी संध्याकाळी बडोदा विमानतळावरून नवी दिल्लीला जाण्यास निघाले होते. या विमानात १६८ प्रवासी होते. पण प्रवासादरम्यान विमानातील एअर कंडिशनर सिस्टिम बंद पडली, तेव्हा प्रवाशांची मोठी नाचक्की झाली.

Viral Video : मोबाईल टॉयलेट्सना पाय फुटलेले पाहून लोकही सैरावैरा पळू लागले

एसी बंद असल्याने प्रवाशांना हा संपूर्ण प्रवास उकाड्यातच करावा लागला. विमानात वाचण्यासाठी देण्यात येणारी मासिकं घेऊन प्रवासी वारा घेत होते. अनेकांचा श्वासही कोंडत होता. ‘टाईम्स नाऊ’च्या बातमीनुसार विमानातील एअर कंडिशन सिस्टिम बिघडली आहे हे कर्मचाऱ्यांना आधीच ठाऊक होते, तरीही प्रवाशांची गैरसोय करत हे विमान प्रवासाला निघाले. विमानात मासिकाने हवा घेत असलेल्या प्रवाशांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एअर इंडियाच्या या कारभाराबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

वाचा : ‘BMW’ चा फुलफॉर्म माहितीये?