accident viral video shows bikers crushed under truck after car door open | Loksatta

Video: कारचा दरवाजा अचानक उघडणे पडले महागात; दुचाकीस्वार थेट घुसला ट्रकमध्ये, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Bike accident viral video: व्हायरल व्हिडिओमध्ये एक भीषण अपघात दिसत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने कारचा दरवाजा उघडल्यानंतर दोन दुचाकीस्वार ट्रकमध्ये घुसले. हा व्हिडिओ बेंगळुरू पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Video: कारचा दरवाजा अचानक उघडणे पडले महागात; दुचाकीस्वार थेट घुसला ट्रकमध्ये, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
photo(social media)

Bike accident viral video: गाडी चालवताना आपण विविध वाहतूक नियमांचे पालन करतो. मात्र, गाडीचा दरवाजा उघडतानाही विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा आपण लक्ष न देता , इतर लोकांना न पाहता दार उघडतो, ज्यामुळे भीषण अपघात होऊ शकतो. असाच एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर शहारे येतील. व्हिडिओमध्ये एक भीषण अपघात दिसत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने कारचा दरवाजा उघडल्यानंतर दोन दुचाकीस्वार दरवाज्याला आपटतात आणि ट्रकमध्ये घुसतात. हा व्हिडिओ बेंगळुरू पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

व्हिडिओमध्ये बाईकवरून दोन तरुण येत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात अचानक जवळ उभ्या असलेल्या कारचा दरवाजा उघडतो. बाईक चालवणारा तरुण दारातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला थोडी धडक बसते. दरवाजा आदळल्यानंतर हे दोन्ही तरुण विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकतात. धडकेने मागे बसलेला तरुण पळून जातो, तर एकजण ट्रकच्या टायरखाली दबला जातो. अपघातानंतर शेजारी उभे असलेले लोक त्याच्या मदतीसाठी धावतात.

( हे ही वाचा: OMG: डॉक्टरांनी तरुणाच्या पोटातून काढले तब्बल ६२ चमचे; असा धक्कादायक प्रकार पहिल्यांदाच घडल्याने ऑपरेशनचाही बनवला व्हिडिओ)

( हे ही वाचा: सुखोई लढाऊ विमानांसह चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची ‘नारी शक्ती’ सज्ज, IAF ची पहिली महिला टीम चीनच्या सीमेवर तैनात)

हा व्हिडिओ पोलिस उपायुक्त कला कृष्णस्वामी यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुम्हाला याबद्दल सांगतो की जेव्हाही तुम्ही बाईकवरून प्रवास करता तेव्हा हेल्मेट घालणे गरजेचे आहे. तसंच कारचे दार उघडताना पुढे-मागे पाहणे अनिवार्य आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करताना डीसीपीने लिहिले, “कृपया तुम्ही तुमच्या वाहनाचे दरवाजे उघडत असताना काळजी घ्या आणि जीवघेणे अपघात टाळा.” हा व्हिडिओ आता इंटरनेटवर हजारो लोकांनी पाहिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अंतराळात शारीरिक संबंध शक्य नाही! मग अंतराळवीर गर्भधारणा करु शकतात यावर चर्चा का?

संबंधित बातम्या

या चित्रात असलेली चुक तुम्हाला दिसली का? तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना पटकन येईल ओळखता
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
Optical illusion Photo: अशा फोटोंमुळेच बुद्धीला कस लागतो, मग शोधा पाहू काळ्या-सफेद रेषांमध्ये लपलेला इंग्रजी शब्द
अहो ऐकता का.. चोरट्या बाईने ‘हे’ एक वाक्य म्हणत सोनाराला घातला लाखोंचा गंडा; Video बघा आणि सावध व्हा
ऐकावं ते नवलचं! १ कोटीचं पॅकेज तरिही ऑफिसमध्ये नाही काम, कर्मचाऱ्याने चक्क बॉसविरोधात कोर्टात दिली तक्रार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : चीनने ‘शून्य कोविड धोरण’ शिथिल केल्यास काय होणार?
नाद कुणाचा करायचा! टायगर शार्कचा व्हिडीओ काढायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाण्यातील थरारक Viral Video पाहाच
मधुमेहाच्या रुग्णांनी रोज ‘हे’ पदार्थ खाण्यास सुरुवात करा; रक्तातील साखरेची समस्या कायमची दूर होईल
या चित्रात असलेली चुक तुम्हाला दिसली का? तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना पटकन येईल ओळखता
पुण्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग; चक्क कंटेनरमध्ये घेतले काश्मिरी ‘केशर’चे पीक