दृढ निश्चय आणि आत्मविश्वासाच्या जोरावर एखादी व्यक्ती कोणतंही लक्ष्य साध्य करु शकते असं म्हटलं जातं. बिहारमधील एका तरुणीने हीच गोष्ट सत्यात उतरवलीय. संप्रीति यादव नावाच्या एका तरुणीला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या गुगलने एक कोटी १० लाखांचं वार्षिक पॅकेज दिलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी संप्रीतिने ५० जागी मुलाखती दिल्या होत्या आणि तिला सर्वच ठिकाणी अपयश आलं होतं.

दिल्ली टेक्नोलॉजिकल यूनिव्हर्सिटीमधून कंप्युटर सायन्समध्ये २०२१ मध्ये संप्रीती बी टेकचं शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाली. संप्रीति तेव्हापासून नोकरीच्या शोधात होती. आपल्याला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एखाद्या मोठ्या कंपनीमध्येच नोकरी करायची आहे असं तिने ठरवलं होतं. यासाठी तिने तब्बल ५० मुलाखती दिल्या होत्या. यामध्ये तिने गुगलमध्येही मुलाखत दिली होती.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

गुगलच्या मुलाखतीच्या एकूण नऊ फेऱ्या झाल्या. या फेऱ्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि वेगवेगळ्या विषयांवर उमेदवारांच्या आकलन शक्तीची चाचणी घेण्यात आली. संप्रीतिने या मुलाखतीमध्ये चांगली कामगिरी करत सर्व फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. त्यानंतर गुगलने तिला वर्षाला १ कोटी १० लाख रुपयांची ऑफर दिली. म्हणजेच महिन्याला जवळजवळ ९ लाखांच्या आसपास पगार दिला ऑफर करण्यात आला. संप्रीतिने ही गुगलची ऑफर स्वीकारलीय.

आज म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून २४ वर्षीय संप्रीति गुगलमध्ये रुजू होणार आहे. विशेष म्हणजे संप्रीतिला गुगलच्या आधी मायक्रोसॉफ्टनेही नोकरीची ऑफर दिली होती. ५० मुलाखतींमध्ये अपयश आल्यानंतर अचानक तिला चार ठिकाणांहून नोकरीच्या ऑफर्सही आल्या होत्या. मात्र तिने गुगलची ऑफर स्वीकारलीय. “मुलाखतींच्या वेळेस माझा फार गोंधळ उडायचा. मात्र मला पाठिंबा देणारे माझे पालक आणि जवळचे मित्र यांनी मला कायमच अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मी रोज अनेक तास मोठ्या कंपन्यांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी वाचन करायचे. अनेक मोठ्या कंपन्यांमधील मुलाखती म्हणजे एखाद्या चर्चेसारख्या असल्याने त्या कंपन्यांबद्दलची माहिती असणं हे फार महत्वाचं असतं,” असं संप्रीति सांगते.

आपल्या मुलाखतीसंदर्भात सांगता संप्रीतिने गुगलच्या टीमकडून ऑनलाइन माध्यमातून एकूण ९ टप्प्यांमध्ये मुलाखत घेण्यात आली. मी या मुलाखतीसाठी बरीच तयारी केली होती, असं संप्रीति सांगते. सर्वच स्तरांमध्ये मला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची मी समाधानकारक उत्तरं दिली. त्यामुळेच माझी निवड झाली आणि मला ही नोकरीची ऑफर देण्यात आली, असं संप्रीति म्हणाली.

मोठ्या पॅकेजपेक्षा गुगलच्या लंडनमधील कार्यालयामध्ये काम करण्याची आपल्याला संधी मिळणार असल्याने आपण अधिक समाधानी असल्याचं संप्रीति सांगते.