मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये किंवा एसटीमध्ये तुम्ही उभा राहून प्रवास केला असेल पण कधी विचार केला आहे का विमानात उभ्याने राहून प्रवास केला तर तो अनुभव कसा असेल. विचार करण्याची गरज नाही कारण लवकरच ही कल्पना सत्यात अवतरणार आहे. जर्मनीमधील हॅमबर्ग येथे मागील वर्षी पार पडलेल्या एअरक्राफ्ट इंटीरीयर एक्सपो या कार्यक्रमामध्ये एव्हींटीरीयर्स या कंपनीने स्कायरायडर 2.0 नावाच्या विमानातील खास सीट्स सादर केल्या होत्या. या वर्षी याच सीट्सचा आणखीन अपडेटेड अवतार म्हणजेच स्कायरायडर 3.0 याच एक्सपोमध्ये सादर करण्यात आला. हा सीट म्हणजे स्टॅण्डींग सिट्स आहेत. ‘अल्ट्रा-बेसिक इकनॉमी’ क्लासमध्ये लवकरच या उभ्या सीट्स पहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खरं तर या उभ्या सीट्सचा सर्वाधिक फायदा विमान कंपन्यांना होणार असून उपलब्ध जागेत त्यांना अधिक लोकांना सामावून घेता येणार आहे. ‘एव्हींटीरीयर्स’चे अभियांत्रिकी सल्लागार जीओटाने पेरुग्नी यांनी सीएनएन ट्रॅव्हलला या संदर्भातील माहिती दिली. ‘आम्हाला विमानाच्या केबीनमध्ये हजारो लोकांना बसवायचे आहेत असा याचा अर्थ न घेता आम्हाला प्रवाशांना पर्याय उपलब्ध करुन द्यायचे आहेत. सध्याच्या हवाई वाहतूकीची स्थिती पाहता प्रवाशांकडे पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसते,’ असं पेरुग्नी सांगतात.

‘या उभ्या सीट्सचा विमानामध्ये वापर केल्यास एकाच केबीनमध्ये स्टॅण्डर्ड इकनॉमी, प्रिमियम इकनॉमी किंवा बिझनेस क्लास आणि अल्ट्रा बेसिक इकनॉमी असे तीन पर्याय उपलब्ध होतील. हा अनुभव विमान कंपन्यांसाठी आणि प्रवाशांसाठी नवीन असणार आहे. यासाठीच आम्ही या सीट्सची निर्मिती केली आहे,’ असं पेरुग्नी म्हणाले.

या स्कायराडरवर बसणे हे अनेक तास घोड्यावर बसून भटकंतीला जाण्यासारखे आहे अशी तुलना कंपनीने केली आहे. खरं तर या सीटवर बसणे म्हणजे गुडघ्यात थोडेसे वाकून उभं राहण्यासारखंच आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांना या उभ्या सीट्सची कल्पना फारशी आवडलेली दिसत नाही. पाहूयात नेटकरी काय म्हणाले आहेत या स्टॅण्डींग सिट्सबद्दल…

१)
या प्रदर्शकांवर बंदी घाला

२)
माणसांनी किंमत न देणाऱ्यांसाठी

३)
सायकलच जणू…

४)
सर्वांनी पेडल मारले तर इंधनही वाचेल

५)
नरकात जाण्याचा मार्ग

६)
सगळ्याच सीट काढा ना

७)
खाली पायच पुरणार नाहीत

८)
आधी हे असं दिसायचं

९)
काय विनोद आहे

१०)
सामानासाठी वाद होणार

या उभ्या सीट्सची संकल्पना पहिल्यांदाच मांडण्यात आलेली नाही. मागील दशकभरापासून या संकल्पनेची चर्चा सुरु आहे. मात्र प्रवाशांच्या प्रतिक्रिया आणि होणारा संभाव्य त्रास पाहता कोणत्याच विमान कंपनीने या सीट्स आपल्या विमानात लावण्याचे धाडस अद्याप तरी केलेले नाही.