‘Sarahah’ सराहा अॅप कालपासून चांगलंच चर्चेत आहे. तर ‘सराहा’ या शब्दाचा अर्थ होतो ‘प्रामाणिकपणा’. आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल जे काही वाटतं ते अगदी प्रामाणिकपणे सांगायंच. न घाबरता किंवा न कचरता, म्हणूनच हे अॅप तयार करण्यात आलंय. अनेकदा होतं असं की समोरच्या व्यक्तीला आपल्याला बरंच काही सांगायचं असतं, बोलायचं असंत पण आपलं बोलणं समोरच्या व्यक्तीला आवडलं नाही तर? असे अनेक विचार आपल्या मनात येतात तेव्हा आपल्या मनातली गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगायची असेल तर अशांसाठी ‘सराहा’ सहारा उत्तम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठून आलं हे अॅप?
सराहा हे अॅप सौदी मधल्या तीन तरूणांनी मिळून तयार केलं आहे. हे अॅप इतकं प्रसिद्ध होईल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. सध्याच्या घडीला ५० लाख युजर्सने हे अॅप डाऊनलोड केलंय. आयओएस आणि गूगल प्लेवर हे अॅप उपलब्ध आहे. २९ वर्षीय जेन अल-अबीदीन तौफीक आणि त्याच्या मित्रानं हे अॅप तयार केलं होतं. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकता. तुमच्या मनातलं बोलू शकता. प्रामाणिकपणे त्यांच्याविषयी मत मांडू शकता अर्थात तुमचं नाव मात्र शेवटपर्यंत त्या व्यक्तीला समजणार नाही. कारण या अॅपमधले मेसेज निनावी त्याच्या इनबॉक्समध्ये जमा होतील. तेव्हा हे अॅप अनेकांच्या प्रसिद्धीस उतरत आहे. सध्या अमेरिका, भारत, फ्रान्स, इंग्लड अशा तीसहून अधिक देशात हे अॅप उपलब्ध आहे. इजिप्त, अरब, ट्युनेशिया या देशात या अॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत.

हे अॅप कसं काम करतं?
-प्ले स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर ईमेल आयडी टाकून तुम्ही लॉग-इन करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक आयडी मिळले. या अॅपवर तुमची प्रोफाईल तयार होईल.
-त्यानंतरही तुमच्या प्रोफाईलची लिंक तुम्ही फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर शेअर करू शकता. जेणेकरून तुम्ही हे अॅप वापरत आहात याची कल्पना इतरांना येईल.
-त्यानंतर तुम्हाला मेसेज यायला सुरूवात होईल. अर्थात हे मेसेज तुम्हाला ओळखणाऱ्या व्यक्तींचे असतील. पण यात मात्र तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव मात्र समजणार नाही.
हे अॅपची क्रेझ सोशल मीडियावर खूपच आहे. पण हे अॅप किती सुरक्षित आहे याबाबत मात्र शंकाच आहे. कारण सेंडरचं नाव यात गुप्त असल्यानं कोणीही याचा गैरफायदा घेऊन एखाद्या व्यक्तीला अश्लिल मेसेजही पाठवू शकतो असंही अनेकांचं म्हणणं आहे. तेव्हा या अॅपच्या विश्वासार्हतेबद्दल एकूणच प्रश्नचिन्ह आहे. तेव्हा योग्य ती काळजी घेऊनच हे अॅप डाऊनलोड करा असा सल्ला अनेक तज्ज्ञांनी दिला आहे.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All you need to know about sarahah anonymous messaging app
First published on: 11-08-2017 at 11:54 IST