Student vs Teachers : शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये गुरु-शिष्याचं नातं असतं. शिक्षकांनी शिक्षकवलेलं ज्ञान विद्यार्थ्यांना उत्तम करिअर घडवण्यासाठी फायदेशीर ठरतं. परंतु, काही ठिकाणी विद्यार्थी शिक्षकांसोबत हुज्जत घालतात आणि त्यांचा अपमान करतात. असाच एक धक्कादायक प्रकार अलाहाबाद विद्यापीठात उघडकीस आला आहे. कारण महिला शिक्षिकांसोबत विद्यार्थ्यांनी जोरदार भांडण केल्याचं व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संस्कृत शिकवणाऱ्या शिक्षिकेशी काही विद्यार्थी हुल्लडबाजी करत असल्याचं समोर आलं आहे.
रिपोर्ट्सनुसार, अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी महिला शिक्षिकेशी वादविवाद करून कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने संशयास्पदरित्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत राडा केल्याचं बोललं जात आहे. हिंदी आणि संस्कृत विभागातील महत्वाची कागदपत्रेही या विद्यार्थ्यांनी फाडून टाकल्याचं समजते. आशुतोष कुमार दुबे (२२) हा विद्यार्थी मंगळवारी स्टुडंट्स युनियनच्या इमारतीसमोर बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी त्याला एसआरएन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (शिवकुती) राजेश कुमार यादव यांनी दिलीय.
इथे पाहा व्हिडीओ
विद्यापीठाच्या व्यवस्थापनाकडू यावर प्रतिक्रिया देण्यात आली की, विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना दुर्देवी आहे आणि याचा विद्यापीठाशी काहीही संबंध नाही. कॅम्पसमध्ये ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. विद्यापाठातील प्रवक्त्यांनी म्हटलं की, दुबे त्याच्या कौंटुबिक समस्यांमुळे नैराश्यात होता. त्यामुळे तो वेळेवर जेवण करत नव्हता. महिलांसोबत भांडण करून विद्यापीठात तोडफोड करणं हे निषेधार्य आहे. थोडी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सर्व केलं जात आहे. विद्यापीठाकडून वेळेवर रुग्णावाहिकेची सुविधा देण्यात आली नाही, म्हणून दुबेचा मृत्यू झाला, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.