Viral video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक जण कुत्रा मांजर पाळतात आणि कुत्र्याचे व्हिडीओ आवडीने शेअर करतात. सोशल मीडियावर प्राण्यांच्या व्हिडीओवर लोक भरपूर लाईक्स आणि कमेंट्स करतात. अनेकांना प्राण्यांबरोबरचे व्हिडीओ आवडतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती त्याच्या आजारी वृद्ध केअर टेकर भेटायला हॉस्पिटलमध्ये आल्याचे दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
असं म्हणतात, प्राण्यांवर तुम्ही जेवढे प्रेम कराल त्यापेक्षा दुप्पट प्रेम प्राणी तुमच्यावर करतात. तुम्ही आजवर कुत्रा मांजरीचे माणसांवरील प्रेम दाखवणारे व्हिडीओ अनेकदा पाहिले असेल पण या व्हिडीओमध्ये चक्क हत्ती त्याच्या केअरटेकरला भेटायला आला आहे. व्हिडीओ पाहून कोणीहीह थक्क होईल.

हेही वाचा : VIDEO : तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक हत्ती दिसेल. हा हत्ती एका हॉस्पिटलमध्ये आलेला दिसत आहे. तो चालत चालत त्याच्या केअर टेकरच्या बेडजवळ येतो. केअरटेकरच्या अंगाला त्याच्या सोंडेने स्पर्श करतो. त्यानंतर पुढे व्हिडीओत दिसते की हत्ती खाली बसतो. तेव्हा एक महिला हत्तीची सोंड धरते आणि केअर टेकरच्या हातावर ठेवते. व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : Pune : “मी पुणे सोडू शकत नाही” ‘ही’ कारणे देत तरुणाने स्पष्टच सांगितले, पाहा Viral Video

rohit_45____ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुके प्राणी कधीही तुमचा विश्वासघात करणार नाही.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “प्राणी माणसापेक्षा जास्त प्रामाणिक असतात.” तर एका युजरने लिहिलेय, “माणसापेक्षा प्राणी बरे” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजवरची सर्वात सुंदर रील” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.