उद्योगपति आनंद महिंद्रा (Industrialist Anand Mahindra) यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सर्वांना आश्चर्यचकीत करत असतात. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन यांचे ट्विटर हँडल रंजक, प्रेरणादायी आणि ह्रदयस्पर्शी गोष्टींचा खजिनाच आहे जो कोणत्याही व्यक्तीचा दिवस सार्थकी लावू शकतो. बिझनेसमन ट्विटरवर आपल्या पोस्टसोबत आपल्या १०.५ मिलियन फॉलोअर्सला त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण अनुभव सांगत असतात. यावेळी त्यांनी भारतामध्ये प्रवास करण्यासाठी आपली बकेट लिस्ट शेअर केली आहे. आणि सर्व नेटकरी देखील त्यांची लिस्ट पाहून सहमती दर्शवत आहे. हिमाचल प्रदेशपासून अरुणाचल प्रेदशापर्यंच आनंद महिंद्रा यांनी त्या गावांबद्दल सांगितले आहे जिथे भविष्यात त्यांना फिरायला जायचे आहे.

आनंद महिंद्रांनी शेअर केली त्यांची Bucket list

आनंद महिंद्रा यांनी कलर्स ऑफ भारत नावाच्या पेजवर एक पोस्ट पुन्हा शेअर केली. ज्यामध्ये ” भारतातील १० सर्वाधिक सुंदर गाव” दाखवले आहेत. हिमाचल प्रदेशातील कल्पा आणि मेघालयातील मावलिननॉन्ग यांचाही या यादी समावेश केला आहे. ट्विटनुसार. हे एशियातील सर्वात स्वच्छ गाव आहे आणि देवाची बाग ( भगवाना का अपना बगीचा) असे म्हटले जाते.

Jitendra Awhad
“ठाण्यात ‘वरून’ हा शब्द सुरू झालाय, तो कुठून येतो? हे…”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar
“शरद पवारांनी शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय केला”; चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ

भारतातील या १० गावांचा लिस्टमध्ये समावेश

केरळमधील कोलेनगोडे गाव, तामिळनाडूमधील माथूर गाव आणि कर्नाटकातील वरंगा गाव देखील यादीत दिलेल्या उर्वरित नावांमध्ये समाविष्ठ आहेत. या यादीत पश्चिम बंगालमधील गोरखे खोला, ओडिशातील जिरंग गाव, अरुणाचल प्रदेशातील झिरो गाव आणि राजस्थानमधील खिमसर गावाचाही समावेश आहे. भारतातील पहिले गाव म्हणून नुकतेच नामकरण झालेल्या उत्तराखंडमधील मानाचाही यात उल्लेख केला आहे.

ही पोस्ट शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहले की, ”आपल्या आस-पास असलेल्या या सुंदरतेने मला थक्क केले आहे….भारतामध्ये प्रवासासाठी माझी बकेट लिस्ट आता तयार आहे.” ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्या पोस्टला ५ हजार पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहे.

हेही वाचा – अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ नाव कसे मिळाले? काय आहे या शब्दाचा अर्थ, जाणून घ्या

नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

एका यूजरने सांगितले की, भारत आपल्या लोभस सुंदरता, सांस्कृतिक समृद्धि आणि विविध अनुभवांसह एक प्रवासीसाठी स्वर्ग आहे. भलेही तुम्ही शांती, रोमांच आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात असाल, भारतामध्ये तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे जाण्याचा आणि तुम्हाला थक्क करण्याचे वचन देते.

हेही वाचा – पीके चॅलेंज घेणं बेतलं तरुणाच्या जीवावर! लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान मद्यपान करणाऱ्या आणखी एका इन्फ्लुएंसरने गमावला जीव

दुसऱ्याने लिहिले, “अतुल्य भारत!” आणखी एक जण म्हणाला, ”अगदी बरोबर-भारताला व्यवस्थित जाणून घेण्यासाठी कित्येक जन्म घ्यावे लागतील.”