पूर्व-मध्य आणि लगतच्या अग्नेय bajus अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे उत्तरेकडे सरकत असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान त्या काही तासांत ते तीव्र वेगाने चक्री वादळात रुपांतरीत होईल असेही सांगितले जात आहे. याच भागाच पुढील 24 तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे केरळमध्ये मान्सून सुरू होण्याचा वेग थोडा कमी होऊ शकतो असाही अंदाज आहे. अरबी समुद्रातील हे वादळ या वर्षातील पहिले चक्री वादळ आहे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे नाव कसे पडले? (How Cyclone ‘Biparjoy’ got its name?)

बांगलादेशने या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ’ असे नाव दिले आहे ज्याचा बंगालीमध्ये अर्थ ‘आपत्ती’ असा आहे. अहवालानुसार, हे नाव जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) देशांनी 2020 मध्ये स्वीकारले होते. यामध्ये बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रासह उत्तर हिंदी महासागरात निर्माण होणाऱ्या सर्व उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा समावेश आहे, कारण चक्रीवादळांना प्रादेशिक नियमांच्या आधारे नाव देण्यात येतात.

WMO आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन (ESCAP) च्या सदस्य देशांकडे चक्रीवादळांना नाव देण्याची एक विशिष्ट प्रणाली आहे. अटलांटिक आणि दक्षिणी गोलार्ध मधील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) सदस्य राष्ट्रांनी दिलेल्या नावांच्या आधारे वर्णमालानुसार नावे दिली आहेत जेणेकरून इतर चक्रीवादळांमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये. चक्रीवादळांची ही नावे स्त्रिया आणि पुरुषांच्या नावावर ठेवली जातात, तर उत्तर हिंद महासागरातील देशांमध्ये चक्रीवादळांची नावे वर्णक्रमानुसार सूचीबद्ध केली जातात आणि लिंग- तटस्थ (gender neutral)आहेत.

2004 मध्ये, हिंद महासागर क्षेत्रातील चक्रीवादळ ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली स्वीकारण्यात आली. जेव्हा जेव्हा चक्रीवादळ तयार होते तेव्हा क्रमाने नावे दिली जातात. या क्षेत्रातील आठ राष्ट्रांनी योगदान दिले होते: बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड, ही नावे आक्षेपार्ह किंवा विवादास्पद नसावी आणि उच्चार आणि लक्षात ठेवण्यास सोपी असावी हा यामागील हेतू होता. याव्यतिरिक्त, ते विविध भाषांमधून निवडले जातात जेणेकरुन विविध भौगोलिक भागातील व्यक्ती ते ओळखू शकतात.

भारतीय हवामानावर ‘बिपरजॉय’ चक्रीवादाळाचा कसा होईल परिणाम? (How Cyclone ‘Biparjoy’ will impact the weather in India?)

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ हे एक तीव्र चक्री वादळ झाले आहे आणि पुढील १२ तासांत ते अति तीव्र चक्रीवादळात रुपातंरित होण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी, आयएमडीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, पूर्व-मध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर आलेले तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय (चक्रीवादळ बिपरजॉय ट्रॅकर) गेल्या ६ तासांत ५ किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेला आले आहे. अतिशय तीव्र चक्रीवादळात तीव्र झाले आहे.

आयएमडीने चक्रीवादळाच्या स्थितीबाबत सांगितले की, ”भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे २.३० वाजता, चक्रीवादळ गोव्याच्या अंदाजे ९०० किमी पश्चिम-नैऋत्य दिशेला, मुंबईच्या १०२० किमी नैऋत्येस, पोरबंदरच्या १०९० किमी दक्षिण-नैऋत्येस आणि कराचीपासून १३८० किमी दक्षिणेस होते. जवळपास तीन तास ते स्थिर होते. ”

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, ”चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ पुढील २४ तासांमध्ये जवळजवळ उत्तरेकडे आणि नंतर ३ दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने सरकेल. त्याच्या प्रभावाखाली, ईशान्य अरबी समुद्र आणि उत्तर गुजरात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ४५-५५ किमी प्रतितास वेगाने ६५ किमी प्रतितास पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.”

हेही वाचा – काही रेल्वे स्टेशनच्या नावामागे P.H. का लिहिले जाते? जाणून घ्या काय आहे याचा अर्थ

हवामान खात्याने सोमवारी सांगितले होते की की, ”आधीच विलंब झालेल्या मान्सूनच्या केरळ किनारपट्टीच्या दिशेने येणाऱ्या या चक्रीवादळाचा महत्त्वपूर्ण परिणाम केरळमध्ये होण्याची शक्यता आहे.” स्कायमेट वेदरने दिलेल्या माहितीनुसार, ”हे चक्रीवादळ ‘धीम्या आणि सौम्य’ गतीने ८ जून किंवा ९ जून रोजीपर्यंत येऊ शकते.” हवामान खात्याने अद्याप केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची प्राथमिक तारीख जाहीर केलेली नाही.

हवामान खात्याचा मच्छिमारांना सावधनेताचा इशारा

दरम्यान हवामान खात्याने मच्छिमारांना पुढील काही दिवस समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे. ८ ते १० जून या कालावधीत केरळ-कर्नाटक किनारे आणि लक्षद्वीप-मालदीव भागात आणि कोकण-गोवा-महाराष्ट्र किनार्‍यालगत आणि बाहेर समुद्र अति रौद्र ते अतिशय रौद्ररुप धारण करण्याची शक्यता आहे. या किनारपट्टीवर समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनाही आयएमडीने परत जाण्याचा सल्ला दिला आहे.

गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये सर्वात जास्त पाऊस पडण्याचा अंदाज

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये सर्वात जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे. जोरदार वाऱ्यामुळे वीज खंडित आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. प्रभावित भागातील लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि त्यांची सुरक्षा राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या चार ते पाच दिवसांत पश्चिम हिमालयीन भागात हलका पाऊस पडेल, ज्यामुळे उन्हाच्या उष्णतेच्या झळांपासून दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तवला. ” दिल्लीच्या बहुतांश ठिकाणी आणि लगतच्या भागात ३०-५० किमी/तास वेगाने गडगडाटासह हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा येईल असेही हवामान विभागाने सांगितले आहे.