सोशल मीडिया हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. पण त्याचा अतिवापर आणि चूकीच्या गोष्टींसाठी वापर आपल्या जीवावर बेतू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंगदरम्यान मद्यपान करणाऱ्या इन्फ्लुएंसरचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.या युवकाच्या पत्नीने मंगळवारी चीनी प्रसारमाध्यम जीमू न्यूजला दिलेल्या माहितीमध्ये आपल्या पतीच्या मृत्यूची खात्री केली आहे जो मंगळवारी सकाळी अत्याधिक मद्यसेवनामुळे मृत पावला. एका महिन्यात या खेळादरम्यान झालेला हा दुसरा मृत्यू आहे.

आणखी एक इन्फ्ल्युएंसरचा मृत्यू

एका महिन्याच्या आत व्हायरल ड्रिकिंग चॅलेजमुळे मृत पावणारा हुआंग हा दुसरा व्यक्ती आहे. हा २७ वर्षीय युवक ऑनलाईन जगात मोनिकर झोगं युआन हुआंग जी किंवा ब्रदर हुआंग नावाने ओळखला जात होता. सोशल मीडियावर हुआंग एक इंटरनेट सेलिब्रिटी होता. त्याचे १७६००० फॉलोअर्स होते.

न्यू यॉर्क पोस्टने सांगितले की,”हुआंगने ज्या मद्याचे सेवन केले होते त्याला ‘चीनी फायटवॉटर’ असे बोलीभाषेत म्हणतात. यामध्ये ३५ टक्क्यांपासून ते ६० टक्क्यांपर्यंत मद्याचे प्रमाण असते.” व्हायरल व्हिडिओमध्ये हुआंग कसा एक एक बाटली मद्य संपवितो आणि त्याचा पिरॅमिड तयार करताना दिसत आहे

mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: इरफान पठाणने नाव न घेता पंड्याला सुनावलं, मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतरचं ट्विट होतंय व्हायरल

हेही वाचा – AI ने केली कमाल, म्हातारे झाले बॉलीवूड स्टार्स? पाहा, शाहरुख, सलमान, प्रभास यांचा Old age look.

वांग याने लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान ७ बाटल्या दारू प्यायल्या होती

या आधी ३४ वर्षीय वांग नावाचे सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरने लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान ७ बाटल्या मद्य प्यायले होते ज्यामुळे त्याच मृत्यू झाला होता. खरंतर इन्फ्लूएन्सरने पीके चॅलेंज हारल्यानंतर टीक टॉकचे सहयोगी अॅप डॉयिन वर लाइव्ह येऊ ७ बाटल्या मद्य प्यायले होते. ज्यानांतर त्याची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये आणखी एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा झाला मृत्यू ( फोटो- ट्विटर)
चीनमध्ये आणखी एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा झाला मृत्यू ( फोटो- ट्विटर)

हेही वाचा – IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी भरती सुरु, २० जून तारखेपूर्वी करा अर्ज

चीनमध्ये ट्रेंड होतोय पीके चॅलेंज

सध्या चीनमध्ये हा पीके चॅलेंज खूप व्हायरल होत आहे. यासाठी लोक आपल्या फॉलोअर्स आणि अनोळखी लोकांसह एक स्पर्धेमध्ये सहभागी होतात. ज्यामध्ये व्यक्तीला गाणे, डान्स आणि पुशअप्स सारख्या स्पर्धेत भाग घ्यावा लागतो. या खेळात जिंकणाऱ्यां सहभागींना पुरस्कार आणि बक्षीस दर्शकांकडून मिळते. तर हारणाऱ्यांना शिक्षा मिळते. या स्पर्धेदरम्यान वांग याला मद्य पिण्याची शिक्षा मिळाली होती.