सध्या प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. त्याचा वापर करून आपण अगदी सर्रास विविध फूड डिलिव्हरी अॅपवरून खाद्यपदार्थ मागवीत असतो. मात्र, कधीतरी ऑर्डर घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आपल्याला फारच त्रास सहन करावा लागतो. जसे की, ऑर्डर उशिरा पोहोचवणे, चुकीचे पार्सल आणणे किंवा अत्यंत उद्धटपणे ग्राहकांशी बोलणे. अशा प्रकारच्या गोष्टी नक्कीच तुमच्याबरोबरसुद्धा घडल्या असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर सध्या स्विगी कर्मचाऱ्याने असेच काहीसे केल्याच्या प्रकाराची चर्चा होत असल्याचे पाहायला मिळते. त्या कर्मचाऱ्याने खूप माज आल्याप्रमाणे तो ऑर्डर घेऊन येणार नसल्याचे नेहा नावाच्या व्यक्तीला सांगिलते. तिच्याबरोबर नेमके काय घडले ते पाहू.

हेही वाचा : डोसा त्यावर आईस्क्रीम, चेरी अन् टूटीफ्रूटी! पाहा या ‘डोसा आईस्क्रीम’चा व्हायरल Video; नेटकरी म्हणतात “…

एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावर नेहाने @Neha_ns9999 या अकाउंटवरून तिच्याबरोबर घडलेला एक किस्सा एक पोस्ट लिहून शेअर केला आहे. त्यानुसार, “प्रिय, @Swiggy @SwiggyCares, मी नुकतीच स्विगीवरून खाद्यपदार्थांची एक ऑर्डर दिली होती; मात्र ती माझ्यापर्यंत पोहोचलीच नाही. “माझ्याकडे वेळ नाही. मी ऑर्डर घेऊन येणार नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते करा”, असे म्हणून त्या डिलिव्हरी बॉयने माझी ऑर्डर आणून देण्यास नकार दिला. आता मी कुठे जाऊ?” असे नेहाने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

ही पोस्ट शेअर होताच नेटकऱ्यांनी त्यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तसेच स्विगीनेदेखील या पोस्टची दखल घेऊन, त्यावर नेहाला उत्तर दिले आहे.

“@Neha_ns9999 आमच्या टीमबरोबर फोनवर बोलून, तुमच्या समस्येवर काहीतरी उपाय निघेल, अशी आमची आशा आहे. तुम्हाला कोणतीही मदत लागल्यास आम्ही इथेच आहोत.” असे स्विगीने उत्तर दिले आहे.

हेही वाचा : एका ‘लिपस्टिकने’ केले चिमुकलीचे रडणे सेकंदात गायब! व्हायरल Video पाहून पोट धरून हसाल!

मात्र, या सर्व प्रकाराबद्दल नेटकऱ्यांचे नेमके म्हणणे काय आहे ते पाहा.

“केवढा तो फुकटचा माज!” असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “माझ्याबरोबरसुद्धा असे घडले होते. हे ऑर्डर पोहोचवणारे कर्मचारी सतत नवीन युक्त्या शोधून काढतात. मी तेव्हा स्विगी केअरला संपर्क केला होता; मात्र काहीही घडले नाही. दोन-तीन वेळा माझे पैसे वाया गेले आहेत. अशा सर्व अनुभवांमुळे मी ऑनलाइन ऑर्डर करणे बंद केले,” असे स्वतःच्या अनुभवाबद्दल सांगितले आहे.
तिसऱ्याने, “खरं तर स्विगीने आता ऑर्डरसाठी ओटीपीचा वापर केला पाहिजे. कारण- एकदा माझी ऑर्डर शेजाऱ्यांच्या घरी पोहोचवली गेली. आता ते शेजारी चांगले होते म्हणून त्यांनी ती परत केली होती,” असे म्हटले आहे.

नेहाने ही पोस्ट तिच्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटवरून शेअर केल्यानंतर त्यावर आठ हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrogant swiggy delivery boy refused to delivery women food order post went viral on social media check out dha
First published on: 08-02-2024 at 13:48 IST