सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत अनेक जण यात आवडीने डान्स करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक काकू अमृता खानविलकरच्या चंद्रमुखी चित्रपटातील लोकप्रिय चंद्रा गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यात काकूंनी गाण्याच्या प्रत्येक बोलावर अशा काही स्टेप्स केल्यात की अनेकांनी त्यांच्या धाडसाला सलाम केलंय. भले भले डान्सर काकूंचा हा डान्स पाहून नक्कीच हैराण होतील.
चंद्रा हे गाणं सोशल मीडियावर इतकं लोकप्रिय झालं की, अनेकांनी त्यावर एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ, रील्स बनवल्या. याच गाण्यावर एक काकू अप्रतिम डान्स करताना दिसतायत. गाण्याच्या प्रत्येक बोलावर त्यांनी वेगवेगळ्या स्टेप्स करत संपूर्ण स्टेज कव्हर केला, त्यामुळे मागे नाचणाऱ्या काकूंपेक्षा याच काकूंकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या. अनेक जण तर काकूंचा हा डान्स पाहून कदाचित अमृता खानविलकरचा डान्सही विसरले असतील. या काकू कोण काय म्हणेल याचा कसलाही विचार न करता जसं जमेल तसं बिनधास्तपणे नाचतायत. कधी पदर पकडून उड्या मारतायत, काकूंची एनर्जी अप्रतिम आहे. काकूंचा डान्स पाहून इतर महिलासुद्धा त्यांना प्रोत्साहन देताना दिसून येत आहे. काकूंची डान्स प्रती आवड पाहून कुणालाही त्यांच्या वयाचा अंदाज येणार नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
nitingavali_homeminister या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ताईच्या धाडसाला सलाम” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी काकूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “खरंच धाडसाला सलाम, कारण चार लोकं आपल्याला बघतायत यापेक्षा जास्त महत्त्व स्वतःला दिलंय.. मी आली आहे, मला आनंद घेणारच.. कसलीही फिकीर नाही… हे प्रत्येक ताईंनी करायला हवं..” तर युजरने लिहिलेय, “आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त मन मोकळं जगता यायला हवं, “खरंच खूप खूप सुंदर डान्स”; काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजीसुद्धा शेअर केले आहेत.