Aunty Dance With Frog Video : सोशल मीडियावर फेम होण्यासाठी लोक कधी काय करतील याचा नेम नाही. त्यासाठी अनेकदा लोक प्राण्यांच्या जीवाशी खेळताना दिसतात. लाइक्स, व्ह्युजच्या हव्यासापोटी ते प्राण्यांबरोबर विचित्र प्रकार करताना दिसतात. अशा प्रकारे एका महिलेने सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी चक्क बेडकांबरोबर विचित्र व्हिडीओ बनवला, ज्यात ती मोठ्या बेडकांना चक्क डोक्यावर आणि गळ्यात घेऊन विचित्र प्रकारे नाचतेय. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. तर अनेकांना तिचा डान्स पाहून हसू आवरणे अवघड झाले आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला डान्स रीलसाठी व्हिडीओ शूट करतेय. यावेळी तिने तिच्या डोक्यावर एक मोठा जिवंत बेडूक ठेवलाय. तर दुसरा जिवंत बेडूक तिने नेकलेस असल्याप्रमाणे गळ्यात लटकवला आहे. अशा प्रकारे ती एका बेडकाला डोक्यावर आणि दुसऱ्याला गळ्यात लटकवून अतिशय विचित्र प्रकारे नाचतेय आणि डान्स रील बनवतेय. नाचताना ती सारखी ती त्या बेडकांना हात लावतेय. महिलेचा हा विचित्र प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यावर युजर्सही मजेशीर आणि संतप्त अशा प्रतिक्रिया देत आहेत.
महिलेचा बेडकांबरोबरचा हा विचित्र डान्स व्हिडीओ @soo_funny_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लोकांनी कमेंट्समधून महिलेला चांगलंच ट्रोल केलं आहे, तर अनेकांनी फार हास्यास्पद कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं की, नवऱ्यानं मंगळसूत्र दिलं नाही म्हणून बेडूक घालून फिरतेय. दुसऱ्यानं लिहिलं की, दीदी तुला दुसरं काही मिळालं नाही का? तिसऱ्या एकानं लिहिलं की, बिचाऱ्या बेडकांवर अन्याय होतोय.