खाद्यपदार्थ,रेसिपी यामध्ये जगभरात सतत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. असाच एक अजब प्रयोग एका व्यक्तीने केला आहे. ओली पॅटरसनला स्वयंपाक करायला आवडतो. त्याचे इन्स्टाग्राम हँडल आपल्याला त्याच्या उत्कटतेबद्दल सांगण्यासाठी पुरेसे आहे. तो बऱ्याचदा त्याच्या सोशल मिडीयावरून मनोरंजक पदार्थ बनवण्याचे व्हिडीओ शेअर करतो. तथापि, कोणालाही अपेक्षित नव्हते असा एक कलिंगड पिझ्झा बनवण्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तसेच टिकटॉकवर पोस्ट केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर डॉमिनोज ऑस्ट्रेलियाने ही रेसिपी वापरून बघण्याचा निर्णय घेतला आणि नेटिझन्सना या “लो-कार्ब” पिझ्झा पर्यायाबद्दल त्यांचे काय मत आहे ते विचारले.

कसा बनवायचा हा पिझ्झा?

ओली पॅटरसनला जास्तीत जास्त लोकांनी टरबूज पिझ्झा वापरण्याची इच्छा होती म्हणून त्याने टिकटॉकवर नंतर  इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये त्याने एक कलिंगडचा मोठा गोल आकारात पीस कापताना दिसतो. कापलेलं कलिंगड तो ग्रिल करतो आणि त्यावर बार्बेक्यू सॉस लावतो. नंतर त्यावर चीझ आणि पेपरोनी घालून पिझ्झा ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवतो. व्हिडीओच्या शेवटी मस्त गरम गरम वितळलेल्या चीझसह पिझ्झा तयार होतो. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने खाली कॅप्शनमध्ये “माझा प्रसिद्ध टरबूज पिझ्झा टिकटॉकवर आणायचा होता त्यामुळे अधिक लोक ही रेसिपी करू शकतात अशी आशा आहे!” असं म्हणत त्याने रेसिपी कशी करायची हे लिहल आहे.

डॉमिनोज ऑस्ट्रेलियानेही केली रेसिपी ट्राय

डॉमिनोज ऑस्ट्रेलियाने ओली पॅटरसनच्या पिझ्झा रेसिपीपासून प्रेरणा घेतली आणि ती त्यांच्या स्वयंपाकघरात पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला. “जेव्हा तुम्ही @elburritomonster ला टरबूजावर पिझ्झा बनवताना पाहिले तेव्हापासून तुम्ही आमच्याकडे कमी कार्ब क्रस्ट ऑप्शन मागत आहात, आम्हाला ते तुमच्यासाठी उपलब्ध करण्याची गरज होती. तुम्ही ट्राय करून पहाल का? ” अशा कॅप्शनसह डॉमिनोज ऑस्ट्रेलियाने व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या पिझ्झा रेसिपीमुळे नेटिझन्स खूश झाले का?  नेटीझन्सच्या कमेंट्सवरून जाणून घेऊयात

recation on pizza

comments on watermelon pizza

तुम्हाला टरबूज पिझ्झा ट्राय करायला आवडेल का?