विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धाच्या विजयाची मालिका भारताने रविवारीही कायम राखली. रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीनंतर गोलंदाजीत कुलदीप यादव, हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांनी चमक दाखवल्यामुळे भारताने मँचेस्टरमध्ये ‘विजयासप्तमी’ साजरी केली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार ८९ धावांनी हरवले. नेमक्या फादर्स डेच्या दिवशी भारताने पाकिस्तानवर विजय मिळल्यानंतर ट्विटवर #BaapBaapHotaHai हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यापासून ते अनेक क्रिकेट चाहत्यांनी हा हॅशटॅग वापरून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देत भारतच तुमचा बाप असल्याचे म्हटले आहे. या हॅशटॅगवरुन अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. पाहुयात असेच काही व्हायरल झालेले मिम्स.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१)
‘बाप’ परफॉर्मन्स…

२)
सर्वात भारी टी-शर्ट

३)

नाच्चोओओओ…

४)

पाकिस्तान ही एकमेव टीम

५)

मी ते तुम्हाला सांगू शकत नाही

६)

पाकिस्तानी लष्कर म्हणते ११ झाडे पडली

७)

मुलांसाठी एवढं करुनही

८)

पाकिस्तानी फॅन्स

९)

बाबा जिंकले बाबा जिंकले

१०)

फादर्स डे

११)

असं झालं काय

१२)

याहून अधिक आम्ही काहीच करु शकत नाही

१३)

आधीच बोलून मोकळा झाला

१४)

डोक्याने गेम खेळले

१५)

एवढ्या अंतरात तर

१६)

कधी कधी वाटतं आपणच…

१७)

पाकिस्तानी चाहते

१८)

असा प्रवेश करणार पाकिस्तानमध्ये

१९)

एवढ्या लांब आलोय तर सगळ्यांना बॅटिंग मिळायलाच हवी

२०)

हे असं नातं आहे तर..

२१)
‘सुनले बेटा पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्थान…’

दरम्यान, या सामन्यामध्ये १४० धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सामन्यामध्ये भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी झाल्याने तो पुढचे काही सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे स्पर्धेमधील सलग तिसरा विजय भारताने मिळवला असला तरी भारताच्या चिंता वाढल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baap baap hota hai trends on twitter after india beats pakistan scsg
First published on: 17-06-2019 at 09:15 IST