चीन हा विस्तारवादी देश आहे असं म्हटलं जातं. अगदी आजूबाजूच्या लहान मोठ्या भूभागांवर चीनने दावा केल्याचा इतिहास आहे. हाँगकाँग असो, तिबेट असो किंवा सध्या वाद सुरु असलेला तैवान असो चीनने कायमच आपल्या सीमांच्या आजूबाजूला असणाऱ्या भूप्रदेशावर दावा केल्याचे दिसून येते. भारतामधील अरुणाचल प्रदेशवरुनही चीन अनेकदा उगाच खुसपटं काढताना दिसतो. मात्र आता चीनने हद्दच केली आहे. येथील काही सरकारी वृत्तवाहिनीने जगातील सर्वात उंच एव्हरेट शिखर हे चीनमध्ये असल्याचा दावा केला आहे. भारत,नेपाळ आणि चीनच्या सीमेपासून जवळ असणारे एव्हरेस्ट हे नेपाळमध्ये आहे. मात्र आता चीनमधील सरकारी वृत्तवाहिनीने एव्हरेस्ट हा भाग चीनमधील तिबेट प्रांतात आहे असं म्हटलं आहे. यावरुनच नेटकऱ्यांनी चीनची चांगली फिरकी घेतल्याचे चित्र सध्या इंटरनेटवर दिसत आहे.

झालं असं की चीनमधील सरकारची बाजू मांडणारी वृत्तवाहिनी म्हणून ओळख्या जाणाऱ्या सीजीएनटीने (चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क) या सरकारी वृत्तवाहिनीच्या ट्विटर हॅण्डलवरुन एव्हरेस्टचा फोटो पोस्ट केला होता. मात्र या फोटोबरोबर दिलेल्या कॅप्शनमध्ये एव्हरेस्ट हा चीनच्या ताब्यातील तिबेटमधील प्रदेशात असल्याचे म्हणजेच चीनच्या भूभागावर असल्याचे म्हटले होते. ‘जगातील सर्वोच्च शिखर हे चीनच्या तिबेटमधील स्वायत्तता असणाऱ्या प्रांतात आहे’ असा एव्हरेस्टचा उल्लेख या पोस्टमध्ये होता.

अनेक भारतीयांनी आणि नेपाळमधील इंटरनेट युझर्सने याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर ही कॅप्शनबदलून दुसरी कॅप्शन देत फोटो पुन्हा नव्याने पोस्ट करण्यात आले. मात्र जुन्या पोस्टचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल करत भारतीय तसेच नेपाळमधील नेटकऱ्यांनी चीनला चांगलेच खडे बोल सुनावले. अनेकांनी चीनला यावरुन ट्रोल केल्याचे ट्विटवरुन दिसून आलं. #BackOffChina हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होत होता. पाहुयात काही व्हायरल ट्विटस

नेपाळमध्ये आहे एव्हरेस्ट…

कदाचित त्यांना…

साऱ्या जगाला माहितीय…

आम्ही हे सहन करणार नाही…

सगळचं चीनचं आहे..

नेपाळसाठी सुचना

पहिल्यांदा नाही…

ज्ञान वाढवा

नीट अभ्यास करा

लोकं इतिहास बदलतात तुम्ही तर…

दरम्यान, या वादासंदर्भातील काही ट्विटसमध्ये नेपाळमधील काही जणांनी भारत आणि चीन या दोन अवाढव्य देशांच्यामध्ये असणाऱ्या नेपाळला या दोन देशांमधील वादामुळे खूप नुकसान होत असल्याचे मत व्यक्त केलं आहे.