कुरकुरीत, चवदार आणि स्वादिष्ट वेफर्स खायला कोणाला आवडतं नाही. वेफर्स खायला सर्वांनाच आवडतात. तुम्हाला बाजारात विविध प्रकारचे वेफर्स मिळतात. बटाट्याचे वेफर्स किंवा केळीचे वेफर्स. पण तुम्ही हे वेफर्स कसे तयार केले जातात हे पाहिले आहे का? नसेल तर हा व्हिडीओ पाहा. सध्या सोशल मीडियावर विविध खाद्यपदार्थ कसे तयार केले जातात याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असेच केळीचे वेफर्स तयारचा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

केळीचे वेफर्स दक्षिण भारतातील खूप लोकप्रिय पदार्थ आहे. हे कुरकुरीत वेफर्स कच्च्या केळीपासून तयार केले जातात आणि त्यांना सोनेरी पिवळसर रंग येईपर्यंत तळले जातात. ते चवीला ते थोडे गोडसर किंवा खमंग असू शकतात आणि अनेकदा त्यावर लाल मिरची पावडर आणि काळी मिरी यांसारखा मसाला घालून तयार केले जातात.

हेही वाचा – “हा कसा रावण आहे, भाऊ!” बाईकवरुन केली एँट्री आणि स्टेजवर येताच नाचू लागला; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

व्हायरल व्हिडीओ एक लहान विक्रेत्याचा आहे. पण बऱ्याच ठिकाणी केळीची वेफर्स तयार करण्यासाठी मोठ्या मशीनरी वापरल्या जातात.