scorecardresearch

Video: पोपटांमध्ये रंगली बास्केटबॉलची स्पर्धा, खेळ पाहून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात है’

सोशल मीडियावरील प्राण्यापक्ष्यांचे व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं. रोज समोर येणारे व्हिडीओ विचार करायला भाग पाडतात. प्राणी माणसांसारखे वागताना पाहून कुतुहूल वाटतं.

Parrot_BasketBall
Video: पोपटांमध्ये रंगली बास्केटबॉलची स्पर्धा, खेळ पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात है'

सोशल मीडियावरील प्राण्यापक्ष्यांचे व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं. रोज समोर येणारे व्हिडीओ विचार करायला भाग पाडतात. प्राणी माणसांसारखे वागताना पाहून कुतुहूल वाटतं. तसं पाहिलं तर कुत्रा, मांजर आणि पोपट हे माणसाच्या जवळ असलेले प्राणी आहेत. अनेकदा घराबाहेर टांगलेल्या पिंजऱ्यात पोपट आपण पाहिला असेल. माणसासारखे बोलणारे पोपट कायम लक्ष वेधून घेतात. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कारण पोपटांचा दोन टीम बास्केटबॉल खेळताना यात दिसत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही टीम ओळखणं देखील सोपं आहे. कारण एक टीम हिरव्या रंगात आहे. तर एक टीम पिवळ्या रंगात आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती स्पर्धा सुरु करताना पोपटांच्या दिशेने बॉल फेकतो. त्यानंतर पोपटांची बास्केटबॉल स्पर्धा सुरु होते. पॉइंट मिळवण्यासाठी धडपड पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बास्केटमध्ये बॉल टाकण्यापासून एकमेकांकडून बॉल खेचून घेण्यापर्यंत आणि कुठच्या रिंगमध्ये बॉल टाकायचा याबाबत ज्ञान असल्याचं दिसतं. पिवळा रंगाचे पोपट हिरव्या रंगाच्या पोपटाकडून हिसकावून त्यांच्या रिंगमध्ये बॉल टाकण्यासाठी धाव घेतो आणि पॉइंट मिळवतो. पण शेवटी कोण जिंकत हे सांगणं कठीण आहे. पण सामना रंगतदार झाला असंच म्हणावं लागेल.

बास्केटबॉल स्पर्धेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच व्हिडीओवर लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Basketball competition in parrots viral video rmt

ताज्या बातम्या