Anand Mahindra latest Tweet : महिंद्रा समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रीय राहून नवनवीन व्हिडीओ शेअर करत असतात. महिंद्रा ट्विटरवर पोस्ट शेअर करून माणसांमध्ये दडलेलं छुपं टॅलेंट जगासमोर आणण्याचा प्रयत्नही करतात. त्यांचे व्हिडीओ नेटकऱ्यांना नेहमी प्रेरणादायी वाटतात. त्यामुळे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला इंटरनेटवर उदंड प्रतिसाद मिळतो. आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. संसार प्रपंचात सुखाची सावली मिळण्यासाठी प्रत्येकालाच एक सुंदर घर खरेदी करावंस वाटतं. घर म्हटलं की संसार आलाच आणि याच संसाराला दिशा देण्यासाठी एका सुंदर घरात राहण्याची सर्वांचीच इच्छा असते. अशाच प्रकारच्या एका घराचा व्हिडीओ महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉक्सला अनफोल्ड केल्यावर होते घराची आकर्षक बांधणी, पाहा व्हिडीओ

महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत काही कामगार एका बॉक्सला अनफोल्ड करताना दिसतात. या बॉक्सला अनफोल्ड केल्यानंतर त्याचं रुपातंर एका सुंदर घरात होत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करून महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, “४० लाखात एक रुमसेट. भारतात याचा खूप फायदा होऊ शकतो. गरजेच्या वेळी हा खूप छान विकप्ल ठरू शकतो.” हा व्हिडीओला ५८ लाख लोकांनी पाहिलं आहे. तसंच शेकडो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला सुंदर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

नक्की वाचा – ५३ वर्षांच्या रिक्षा चालकाने घरातच कंबर कसली, ‘असा’ बनला बॉडी बिल्डर, पाहा वर्क आऊटचा Video

इथे पाह व्हिडीओ

महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “खूपच सुंदर कल्पना आहे. भारतात याची सुरुवात व्हायला पाहिजे.” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, “खूपच सुंदर घर आहे सर.” महिंद्रा एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. सोशल मीडियावर सक्रीय राहून ते जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात. लोकांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी ट्विटरवर प्रेरणादायी व्हिडीओ शेअर करत असतात. एका तरुणाने जगातील सर्वात स्वस्त ट्रेडमिल बनवली होती. या ट्रेडमिलचा व्हिडीओ पाहून महिंद्रा प्रभावित झाले होते. ट्रेडमिलची पोस्ट शेअर करून त्यांनी सुंदर कॅप्शनही दिलं होतं. या माणसाला यंदाचा सर्वात इन्व्होटीव्ह अवॉर्ड द्यायला हवा, असं ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beautiful home constructed in small box anand mahindra shared video on twitter captioned it should be in india nss
First published on: 12-01-2023 at 19:54 IST