दुसऱ्याच्या मालकीची गोष्ट त्याच्या न कळत चोरायची आणि घटनास्थळावरून पळ काढायचा अशा अनेक चोरीच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेमध्ये वेळोवेळी समोर येतात. मात्र बेल्जियममध्ये सहा चोरांना एका दुकानदाराने आत्ता पैसे नाहीत नंतर या असं सांगून हकलल्यानंतर खरोखरच ते चोर काही तासांनी परत आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार ही चार्लीरोई शहरामध्ये घडली आहे. ही घटना एका ई-सिग्रेट विकणाऱ्या दुकानामध्ये घडली आहे. या दुकानाचा मालक असणाऱ्या डिडिएरने प्रसंगावधान राखत सर्व परिस्थिती हाताळली. यासंदर्भात डिडिएरने आरटीएल या सीएननच्या सहय्योगी वेबसाईटला माहिती दिली. दुपारच्या वेळेला सहा शस्त्रधारी व्यक्ती माझ्या दुकानामध्ये घुसले. आणि त्यांनी माझ्याकडे पैश्याची मागणी केली. मी घाबरून न जाता त्यांना सध्या माझ्याकडे पैसे नसून नंतर आलात तर अधिक पैसे तुम्हाला मिळतील असं मी त्यांना सांगितल्याचे डिडिएर म्हणाला. चोर पहिल्यांदा दुकानात आलेले तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. त्यांना मी हा चोरीचा योग्य वेळ नसून तुम्ही संध्याकाळी आलात तर मी तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत पैसे देऊ शकतो असं डिडिएरने वेळ मारून नेण्यासाठी चोरांना सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिडिएरचे म्हणणे चोरांना पटले आणि ते तिथून निघून गेले. आता हे चोर संध्याकाळी परत येणार नाही असं समजून डिडीएअरने यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनाही चोर पुन्हा येणार नाहीत असं सांगत फोन ठेऊन दिला.

मात्र अडीच तासाने म्हणजे दुपारी साडेपाच वाजता हे चोर पुन्हा त्याच दुकानात आले. त्यावेळीही डिडिएरने त्यांना, ‘अजून दुकान बंद व्हायची वेळ झालेली नाही. तुम्हाला घड्याळ घेण्याची गरज आहे आत्ता साडेपाच वाजलेच साडेसहा नाही, असं सांगितलं. यावेळीही ते चोर शांतपणे निघून गेले. मात्र पुन्हा हे सहाजण संध्याकाळी साडेसहा वाजता दुकानदाराकडे पैसे मागायला आले तेव्हा त्यांना साध्या कपड्यातील पोलिसांनी अटक केली.

अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी एक जण अल्पवयीन आहे. तर एकजण पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.