West Bengal Temperature Video: उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. त्याचवेळी, पश्चिम बंगाल सध्या कमालीच्या उष्णतेच्या सावटाखाली आहे आणि तापमानाचा पारा कमालीचा चढला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागा (IMD) नुसार, पश्चिम बंगाल, बिहार आणि किनारी आंध्र प्रदेशात पुढील चार ते पाच दिवस अशी भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे लोक छत्री खरेदी करत आहे आणि स्वत:ला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वाढत्या तापमानाचा मानवाच्या आरोग्यासह अनेक गोष्टींवर परिणाम होत आहे.

आतापर्यंत तुम्ही वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळत असल्याचे, दुष्काळ पडल्याचे किंवा जंगलात वणवा पेटत असल्याचे ऐकले असेल पण तुम्ही कधी कडक उन्हात अंड उकडल्याचं ऐकलं आहे का? होय, तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. सध्या उष्णता इतकी वाढली आहे की, चक्क भर उन्हात अंड्यापासून ऑम्लेट तयार होत आहे.

एका सोशल मीडिया यूजरने उन्हात असा एक प्रयोग केला आहे जो, चर्चेचा विषय ठरला आहे. वास्तविक, कडक उन्हात एका व्यक्तीने कोणताही गॅस, स्टोव्ह न वापरता, गच्चीवर कडक उन्हात तवा तापवून अंड्याचे ऑम्लेट तयार केले आहे.

तब्बल ५०० दिवस अंघोळ न करता २३० फुट खोल गुहेत राहिली महिला! पण का? जाणून घ्या

उन्हामध्ये शिजवलं अंड

सोशल मिडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती बंगाली भाषेत सांगत आहे की, त्याने तवा खुल्या गच्चीवर ठेवला. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, सुर्याचा प्रकाश थेट पडत आहे अशा ठिकाणी ठेवून उन्हात तवा तापवतो. उन्हात तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर एक अंड फोडून तव्यावर पसरवतो. अंड तव्यावर टाकल्यानंतर काही काळानंतर त्याचे ऑम्लेट तयार होते. त्यानंतर तो व्यक्ती ऑम्लेट खाऊन बघतो आणि एकदम चांगले झाल्याचे सांगतो.

व्हिडिओ झाला व्हायरल

व्हिडिओवर कमेंट करून लोक वाढत्या तापमानावर चिंता व्यक्त करत आहेत. एकाने लिहिले की, ”हे आश्चर्यकारक गोष्ट आहे. असे देखील होऊ शकत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसऱ्याने लिहले की, ‘उष्णता सध्या शिगेला पोहचली आहे.’