मुंबई लोकल ट्रेन हा मुंबईकरांचा श्वास आहे. तिच्याशिवाय मुंबईकरांचे दैनंदिन जीवन अवघड होऊन जाईल. मुंबई आणि उपनगरात प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वांत जलद, स्वस्त पर्याय मानला जातो. त्यामुळे मुंबई लोकल कायमच गर्दीने खचाखच भरलेली दिसते. मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. आता बंगळुरूमधील मेट्रोचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर अनेकांना मुंबई लोकल ट्रेनची आठवण येत आहे.

प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बंगळुरू मेट्रोचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील प्रवाशांची गर्दी पाहून अनेकांना मुंबईतील लोकल ट्रेनची आठवण करून दिली आहे. मुंबई लोकलमधून ज्याप्रमाणे रोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात त्याचप्रमाणे बंगळुरू मेट्रोतूनही अनेक प्रवासी रोज प्रवास करतात. बंगळुरू हे शहरातील देशातील सर्वांत मोठे आयटी हब मानले जाते. या ठिकाणी अनेक कंपन्यांची मोठी ऑफिसेस, मेन ब्रँच आहेत. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत आयटी हबमधील मेट्रो स्थानकात प्रवाशांची खूप गर्दी असते.

Job opportunity in CBI apply immediately
सीबीआयमध्ये नोकरी करण्याची संधी, त्वरित अर्ज करा…
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
Mumbai Metro Introduces Wristband Ticketing for Metro 1 Route No Need for Paper or Mobile Tickets
‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी आता मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोतील महिलांचा डबा गर्दीने खचाखच भरला आहे. तरीही अनेक महिला फूटबोर्डवर उभ्या राहून आत शिरण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या महिलांना आत शिरण्यास मिळाले नाही त्या महिला बाहेरून धक्का देत आत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. इंडिकेटरनुसार ही मेट्रो ट्रेन व्हाइटफिल्ड (कलुगोडी) ते बंगळुरूकडे धावणारी होती.

त्यामुळे बंगळुरूतील आयटी हब असलेल्या ठिकाणावरील मेट्रो स्थानकांमध्ये अशा प्रकारे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. हा व्हिडीओ @GabbbarSingh नावाच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे; ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, स्वत:ची सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळेपर्यंत बंगळुरूमधील लोक मुंबई लोकलवर हसायचे. या व्हिडीओवर आता अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, तरीही बंगळुरू मेट्रो मुंबई लोकलपेक्षा खूपच सुरक्षित आहे. ही एक दुर्मीळ परिस्थिती आहे.