VIRAL : महिलेची CISF जवानाला शिवीगाळ; थर्मल स्क्रिनिंगवरून बंगळुरू विमानतळावर घातला गोंधळ

सीआयएसएफ जवानासोबत एका महिलेने गैरवर्तन करत शिवीगाळ केल्याची घटना घडली. या महिलेचा प्रताप केवळ इथेच संपत नाही तर तिने सीआयएसएफ जवानाकडे पाहून अश्लिल हातवारे करुन लज्जा उत्पन्न होईल, असं गैरवर्तन केलं.

bengaluru-woman-abuses-cisf-jawan-viral
(Photo: IE)

कर्नाटकातील बेंगळुरू इथल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानासोबत एका महिलेने गैरवर्तन करत शिवीगाळ केल्याची घटना घडली. या महिलेचा प्रताप केवळ इथेच संपत नाही तर तिने सीआयएसएफ जवानाकडे पाहून अश्लिल हातवारे करुन लज्जा उत्पन्न होईल,असं वर्तन करत तिने विमानतळावर गोंधळ घातला. याप्रकरणी या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

रिपोर्टनुसार, गेल्या बुधवारी ही महिला इंडिगो कंपनीच्या विमानाने मुंबईला जाण्यासाठी बंगळुरू विमानतळावर आली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक करण्यात आलंय. प्रत्येकाची तपासणी करूनच पुढे सोडण्यात येत असून मगच पुढे विमानातून प्रवास करण्यासाठी सोडलं जातंय. यासाठी बंगळुरू विमानतळावर प्रवाशांच्या थर्मल स्क्रिनिंगसाठी एक रांग लावण्यात आली होती. प्रवाश्यांच्या या रांगेत थर्मल स्क्रीनिंगशिवाय ही महिला पुढे एन्ट्री पॉंइंटच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू लागली होती.

आणखी वाचा: VIRAL VIDEO : हुश्शार अस्वल! घराबाहेर अस्वलाला पाहून महिला म्हणाली, “दार बंद कर”; मग पुढे जे घडलं ते पाहाच…

विमानतळावर या महिलेने नियम मोडून थर्मल स्क्रिनिंगशिवाय एन्ट्री पॉइंटच्या दिशेने जात असल्याचं पाहून विमानतळावर तैनात असलेले सीआयएसएफचे सहाय्यक उप निरीक्षक (एएसआय) मंदीप सिंह यांनी या महिलेला अडवलं. त्यानंतर या सीआयएसएफ जवानाने महिलेला रांगेत उभं राहून थर्मल स्क्रिनिंग करूनच मग पुढे जा अशी विनंती केली. या सीआयएसएफ जवानाने आपल्याला अडवलं म्हणून या महिलेने विमानतळावर गोंधळ घालण्यास सुरूवात केली. स्वतःची चूक असून सुद्धा केवल सीआयएसएफ जवानाने आपल्याला अडवलं या रागाच्या भरात महिलेने जवानाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. या महिलेचा गोंधळ फक्त इथेच संपला नाही तर, तिने जवानाकडे पाहून अश्लिल हातवारे करत गैरवर्तन केलं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : किंग कोब्रा आणि अजगरची खतरनाक फाईट; बघा कोण जिंकलं आणि कुणाची झाली हवा टाईट

‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जवानाने या घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली, त्यानंतर महिला सीआयएसएफच्या जवानांनी घटनास्थळी येऊन महिलेला बाहेर काढलं. त्यानंतर या महिलेला बंगळुरूमधील केआयए पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. ही महिला मुंबईतल्या अंधेरी भागातील रहिवासी असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bengaluru woman abuses cisf jawan makes offensive gesture with finger after being asked to undergo thermal screening at bengaluru airport prp

Next Story
लज्जास्पद! ‘कंबरेचा आकार,बेडवरील कपडे…’ मुलाची मॅट्रिमोनिअल साइटवरची जाहिरात व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी