नवरा-बायकोच्या संसारात मतभेद निर्माण झाले की, घटस्फोट घेण्याचा निर्णय घ्यायलाही काही जण घाबरत नाहीत. मनात संशयाची पाल चुकचुकल्यावर नात्यात दुरावा व्हायला वेळ लागत नाही. लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार-प्रपंच करावा असं सर्वांनाच वाटतं. पण संसाराच्या शिदोरीत एखाद्या गोष्टीची कमी पडली की अनेकांच्या प्रेमसंबंध बिघडतात. घटस्फोट झाल्यानंतर जीवनातील दोघांसाठी खडतर होतो. पण एका महिलेनं घटस्फोट झाल्यानंतर मानसिक तणावात न राहता चक्क मुक्ती दिनच साजरा केला आहे. शास्वती शिवा असं या महिलेचं नाव असून ती बंगळुरु येथील रहिवाशी आहे. चार वर्षांपूर्वी घटस्फोट झाल्यानंतर तिने स्वतंत्रपणे जगलेलं आयुष एका पोस्टच्या माध्यमातून शेअर केलं आहे. लिंकडिनवर तिने ही पोस्ट शेअर केली असून घटस्फोटानंतर मी चौथा मुक्ती दिन साजर करत असल्याचं तिनं म्हटलं आहे. ही पोस्ट वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलेनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, “चार वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला. मी हा दिवस दरवर्षी मुक्ती दिन म्हणून साजरा करते. हा दिवस माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असतो. मागील १४६० दिवस प्रचंड कृतज्ञता असल्यासारखं वाटलं. गेल्या चार वर्षात खूप साऱ्या आवडीच्या गोष्टी करायला मिळतील, याचा मी आयुष्याच्या प्रवासात कधी विचारही केला नव्हता. काही गोष्टी अचानक घडतात. घटस्फोट झाल्यानंतर कशाप्रकारे कलंक लागला जातो, याचा अनुभव मला या देशात आला. पण मी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. आयुष्यात अंधार पसरल्यासारखं एका वेळी वाटतं होतं, पण आता त्यातून बाहेर पडून स्वत:ला सावरलं आहे. मला मिळालेलं स्वातंत्र्य माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे.” ही महिला एका बागेत शांत ठिकाणी बसून चहा पित असल्याचं या व्हायरल पोस्टमध्ये दिसत आहे.

नक्की वाचा – Video: सासरी जाताच नवरीने पहिला रील बनवला, वऱ्हाड्यांसमोरच ‘पतली कमरीया’वर थिरकली अन्…

महिलेनं शेअर केलेली पोस्ट इथे पाहा

या महिलेनं तिला समर्थन देणाऱ्या ७५ हून अधिक गृपचे व्हिडीओ बनवले आहेत. ५०० लोकांचा गृप असलेल्या टेलेग्रामवरही ती तिच्या आयुष्यातील अनुभव सांगत असते. अनेक बॅंड्सकडून तिला पॉडकास्टची कामंही मिळत आहेत. विशेष म्हणजे तिच्या कहाणीवर डिवोर्स इज नॉर्मल नावाचं पुस्तकही प्रकाशित करण्यात येणार आहे. एका नेटकऱ्याने तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत म्हटलं, सुपरहीरो, तुझं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. दुसरा नेटकरी म्हणाला, ठशाश्वती तू खूप खंबीरपणे आयुष्यात प्रवास कर.” अन्य एक नेटकरी म्हणाला, “तू खूप महान आहेस.” “मला तुझा खूप अभिमान वाटतो,” असंही एका नेटकऱ्याने म्हटलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru woman shasvathi siva posted on linkedin about celebrating her fourth divorce anniversary viral news nss
First published on: 25-01-2023 at 15:39 IST