व्हॉट्सअॅप आपल्याकडे सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. अनेकदा व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या मेसेजेसची कोणतीही शहानिशा न करता आपण ते ग्रुपमध्ये किंवा मित्र मैत्रिणींना फॉरवर्ड करत असतो. असाच एक फॉरवर्ड केलेला मेसेज भविष्यात तुम्हाला कधी आलाच तर वेळीच सावध व्हा! नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

गेल्या दोन एक वर्षांत तुम्ही सोशल मीडियावर एक अफवा नेहमीच ऐकली असेल ती म्हणजे अशी की व्हॉट्अॅप आता मोफत राहिले नसून लवकरच युजर्सना त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे. हा मेसेज अनेकदा तुम्हाला आला असेल पण यात तथ्य नाही. हल्ली असाच एक मेसेज व्हायरल होत आहे. ‘your subscription is ending soon. please update your payment information now’ असा तो मेसेज आहे. युजर्सचे व्हॉट्सअॅप सबस्क्रिप्शन संपत आलं असून या सेवेचा लाभ घेण्यासाठी शुल्क भरा असा मेसेज आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर बँक खात्याबद्दल माहिती मागितली जाते. जर तुम्ही यावर माहिती भरलीत तर मात्र तुमच्यासोबत मोठा धोका होण्याची शक्यता आहे. तुमच्या खात्यातून हॅकर्स पैसेही काढू शकतात. सध्या परदेशात मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअॅपवर हा मेसेज फॉरवर्ड होत आहे. हा मेसेज इथेही व्हायरल होऊ शकतो. तेव्हा असा मेसेज आलाच तर वेळीच सावधान व्हा!

वाचा : व्हॉटसअॅपने आणले आणखी एक नवे फिचर