भोपाळमधील एका पेट्रोल पंपावरील धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पेट्रोल पंपावर तीन मुले एका बाईकवरुन आल्याचं दिसत आहे. यावेळी बाईकमध्ये पेट्रोल भरत असताना तिघांपैकी एकाने लायटरने पेट्रोल पंपाच्या नोझलला आग लावली. त्यामुळे काही क्षणात बाईकने पेट घेतला आणि आग पंपावर वेगाने पसरली. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहेत. पेट्रोल पंपावर लागलेली आग खूप वेगाने पसरत होती, मात्र पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी ती तातडीने आटोक्यात आणली. तिथे उपस्थित असणाऱ्य लोकांनी आगीवर वाळूच्या बादल्या फेकल्यामुळे आग आटोक्यात येण्यास मदत झाली. याचवेळी बाईकला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करताना एक तरुण जखमी झाला आहे. हेही पाहा- “पगावारढीच्या स्वप्नांवर…” कर्मचाऱ्याने ऑफिसला उशिरा येण्याचं अनोखं कारण सांगितलं, बॉसनेही भन्नाट प्रत्युत्तर दिलं; स्क्रीनशॉट Viral दरम्यान, या घटनेनंतर तिघांपैकी दोघे घटनास्थळावरून पळून गेले, तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघांवरही जाळपोळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या तरुणाने आपले नाव विजय सिंह असल्याचे सांगितले. तर भरत गतखाने आणि आकाश गौर फरार झलेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेही पाहा- हो पापा की परीच…! धोकादायक पर्वतरांगामधून चारा घेऊन जाणाऱ्या मुलीचा थरारक Video पाहाच कधी घडली घटना? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटारा हिल्स येथील स्प्रिंग व्हॅली कॉलनी येथील रेणुका पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पंपाचे व्यवस्थापक कृपाशंकर द्विवेदी यांनी सांगितले की, रविवार आणि सोमवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास ३ तरुण पेट्रोल भरण्यासाठी बाईकवरुन आले होते. पंपावरील कर्मचाऱ्याने बाईकच्या टाकीत तेल भरण्यास सुरुवात करताच त्यातील एकाने खिशातून लायटर काढून पेट्रोलचे नोझल पेटवले. त्यामुळे कही क्षणात मोठी आग लागली आणि आगीच्या ज्वाळांनी पंपाच्या नोझलसह बाईकला आग लागली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी मोठ्या कष्टाने आग विझवल्याचंही त्यांनी सांगितल. दरम्यान, फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.