बिहारमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. एका परिक्षार्थीने आपल्या जागी चक्क एका मल्याळम अभिनेत्रीचा फोटो लावला. आणि विशेष बाब म्हणजे तो या परिक्षेत पासही झाला आहे. ऋषिकेश कुमार नावाच्या एका विद्यार्थ्याने २०१९च्या माध्यमिक शिक्षक पात्रता परिक्षेचा फॉर्म भरताना या अभिनेत्रीचा फोटो लावला. तो पास झाला. मात्र त्याच्या गुणपत्रिकेवर याच अभिनेत्रीचा फोटो दिसत होता.
या प्रकरणात या विद्यार्थ्याने मुद्दाम अभिनेत्रीचा फोटो लावल्याचा आरोप करत त्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्याचा निकालही रद्द करण्यात आला आहे. जहानाबाद जिल्ह्यातला परीक्षार्थी ऋषिकेश कुमार याने परिक्षेचा फॉर्म भरत असताना आपल्या फोटोऐवजी मल्याळम अभिनेत्रीचा फोटो अपलोड केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहार शैक्षणिक महामंडळाने सर्व परिक्षार्थ्यांना अर्जातल्या चुका सुधारण्याची संधी दिली होती. मात्र तरीही ऋषिकेशने कोणताही बदल केला नाही. त्यामुळे हा फोटो तसाच राहिला. त्यामुळे ऋषिकेशच्या  Admit Card वरही हाच फोटो छापून आला. याहून विशेष गोष्ट म्हणजे हा मुलगा याच Admit card वर परीक्षाही देऊन आला. बिहार बोर्डाने स्पष्टीकरण दिलं आहे की फोटोच्या समस्येमुळे कोणताही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यांच्या आधारावरही परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता.

या परिक्षेत हा मुलगा पासही झाला, तरीही त्याने फोटो बदलला नाही. जेव्हा त्याची गुणपत्रिका व्हायरल होऊ लागली, तेव्हा बिहार बोर्ड अडचणीत आलं. त्यामुले बोर्डाने त्याला नोटीस पाठवली आणि त्याचा निकाल रद्द करण्यात आला. या प्रकरणात आपण कडक कारवाई करणार असल्याचं बिहार बोर्डाने सांगितलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar stet exam malyalam actress photo candidate viral result vsk
First published on: 25-06-2021 at 17:11 IST