scorecardresearch

Viral Video: सावधान! रात्रीच्या वेळी गाडी चालवताय, मग ‘हा’ धक्कादायक व्हिडीओ एकदा पाहाच

रात्री तीन वाजताच्या सुमारास कार चालवताना एका कपलसोबत धक्कादायक घटना घडली, पाहा व्हायरल व्हिडीओ.

Car Incident Viral Video
कारचा रात्रीच्या प्रवासाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला. (Image-Twitter)

दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रवासादरम्यान भयंकर काही घडलं की, अंगावर शहारे आल्याशिवायर राहत नाहीत. अशातच रात्री प्रवास करताना काही भयानक घडत असेल तर वेळीच सावध झालेलं चांगलं असतं. कारण बंगळुरुच्या रस्त्यावर एक कपल प्रवास रात्री ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या कारने प्रवास करत होतं. त्याचदरम्यान दुचाकीस्वारांनी त्यांच्या कारला धडक दिली. धक्कादायक बाब म्हणजे दुचाकीवर असलेल्या दोन तरुणांनी त्या कपलचा ५ किमीपर्यंत पाठलाग केला. हा सर्व भयंकर प्रकार त्यांच्या कारमधील डॅशबोर्डच्या कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रात्रीच्या प्रवासादरम्यान कपलसोबत नेमकं काय घडलं?

दोन तरुण रस्त्याच्या विरुद्ध दिशेनं दुचाकी चालवत कारला धडक देत असल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. कारला धडक दिल्यानंतर दुचाकीवर असलेल्या तरुणांनी कपलला धमकवण्याचा प्रयत्नही केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पण त्यांनी वेळीच सावध होऊन कार मागे घेतली. पण त्या तरुणांनी कारचा पाठलाग करून खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. जवळपास ५ किमीपर्यंत या तरुणांनी कारचा पाठलाग केल्याची माहिती समोर आली आहे. ट्वीटरवर हा व्हिडीओ व्हायरल केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा – फेसबुकवरून प्रेम जडलं अन् लग्नासाठी स्वीडनची महिला थेट भारतात पोहोचली, ताजमहलचं कनेक्शन माहितेय का?

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ

@east_bengaluru नावाच्या ट्वीटर हॅंडलवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बंगळुरु पोलिसांनी तातडीनं दखल घेतली आणि या धक्कादायक घटनेचा तपास सुरु केला आहे. ट्वीटला रिप्लाय देत पोलिसांनी तपासाबाबतची माहिती दिलीय. हा व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट करून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या कपलसोबत घडलेली घटना तुमच्यासोबत घडू नये, यासाठी तुम्ही कार चालवताना काळजी घेतली पाहिजे. रात्री प्रवासात असताना कारचा दरवाजा उघडू नका. गाडी चालवताना डॅशबोर्ड कॅमेराचा वापर करा, असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 18:26 IST