आई ही अशी व्यक्ती आहे जी आपल्या मुलांना संकटातून वाचविण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यास तयार असते. आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी ती स्वत:ची जीवाचीदेखील पर्वा करत नाही. अनेक वेळा केवळ आणि केवळ आपल्या मुलांना वाचविण्यासाठी ती अनेक संकटही स्वत:वर ओढून घेते. याचाच प्रत्यय नुकताच चीनमध्ये आला आहे. एका पक्षिणीने आपल्या पिल्लांना वाचविण्यासाठी चक्क ट्रॅक्टरचा सामना केला आहे. सध्या या पक्षिणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेला व्हिडीओ चीनमधील उलाकब शहरातील असून यामध्ये एक पक्षीण आपल्या पिल्लांना ट्रॅक्टरपासून वाचविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. या व्हिडीओमध्ये एका पक्षिणीने तिच्या पिल्लांना शेतात ठेवलं होतं. यावेळी शेतातील काही कामे ट्रॅक्टरच्या मदतीने सुरु होती. त्यातच एक ट्रॅक्टर या पक्षिणीच्या पिल्लांच्या दिशेने येत होता. या ट्रॅक्टरला पाहिल्यानंतर ही पक्षीण घाईघाईमध्ये येऊन आपल्या पिल्लांजवळ बसली. अनेक प्रयत्न केल्यानंतरही ही पक्षीण या ठिकाणाहून उठत नव्हती. विशेष म्हणजे आपल्या पिल्लांप्रतीचं तिचं प्रेम पाहून ट्रॅक्टर चालकही भावूक झाला आणि त्याने ट्रॅक्टर थांबवून एका भांड्यात या पक्षिणीसाठी पाणी ठेवलं.

सध्या या पक्षिणीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून चीन ग्लोबल टेलीव्हिजन नेटवर्क (CGTN) यांनी त्यांच्या ट्विटर पेजवरुन शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ३० हजार लोकांनी पाहिला आहे. त्यासोबतच १२ हजारपेक्षा जास्त लाईक्सदेखील मिळाले आहेत.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birds mother stops tractor to save its eggs video goes to viral ssj
First published on: 14-07-2019 at 16:04 IST