अमेरिकन मुलींची आशियाई मुलांना मारहाण; एका मुलीला तर चपलीने हाणलं, पाहा VIRAL VIDEO

अमेरिकेत आशियाई वंशाच्या व्यक्तींवर वर्णद्वेषी हल्ले सुरूच आहे. फिलाडेल्फिया शहरात आशियाई वंशाच्या मुलांना मेट्रोमध्ये जबर मारहाण केलीय. यातल्या एका आशियाई मुलीला तर चपलीने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केलीय. याचाच व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Fight-In-American-Metro-beating-up-asians-viral-video
(Photo; Twitter/ MrAndyNgo)

अमेरिकेत आशियाई वंशाच्या व्यक्तींवर वर्णद्वेषी हल्ले सुरूच आहे. फिलाडेल्फिया शहरात इरी स्टेशनजवळ मेट्रोमध्ये चार कृष्णवर्णीय अमेरिकन मुलींनी आशियाई मुलांना जबर मारहाण केलीय. धक्कादायक बाब म्हणजे यात कृष्णवर्णीय अमेरिकन मुलींनी एका आशियाई वंशाच्या मुलीला सुद्धा चपलीने मारहाण केलीय. इतकंच काय तर मुलीचं डोकं आपटून तिला जबर मारहाण केलीय. मारहाणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या चारही कृष्णवर्णीय अमेरिकन मुलींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दक्षिण-पूर्व पेनसिल्व्हेनिया ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटी (सेप्टा) चे पोलीस प्रमुख थॉमस नेस्टेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर फिलाडेल्फियाच्या शेजारच्या ओल्नी येथून बुधवारी तीन आशियाई वंशाची मुलं आणि एक महिला विद्यार्थी मेट्रो ट्रेनमधून प्रवास करत होते. ही मेट्रो ट्रेन जेव्हा एका बोगद्यातून जात होती, त्यावेळी त्यांच्यावर चार कृष्णवर्णीय अमेरिकन मुलींनी हल्ला केला. एरी स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात या मारहाणीची घटना कैद केली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ आपण पाहू शकतो की, मेट्रोमध्ये चार कृष्णवर्णीय अमेरिकन मुली आशियाई वंशाच्या मुलांना लाथा-बुक्के मारत असल्याचं दिसत आहे. याआधी मुलींनी ट्रेनमध्ये बसलेल्या आशियाई मुलांच्या गटाला शिवीगाळ देखील केली. या व्हिडीओमध्ये दिसणारे हल्लेखोर मुली कृष्णवर्णीय अमेरिकन तर पीडित मुले आशियाई किंवा आशियाई अमेरिकन असल्याचं दिसत आहे. इतकंच काय तर ट्रेनमध्ये बाजुला उभ्या असलेल्या आणखी दुसऱ्या आशियाई मुलीला सुद्धा या कृष्णवर्णीय अमेरिकन मुलींनी मारहाण केली. यावेळी त्या कृष्णवर्णीय अमेरिकन मुलींनी आशियाई मुलीच्या कानशिलात मारली. त्यानंतर तिचं डोकं ट्रेनच्या दरवाजावर जोरजोरात आपटत तिला जमिनीवर पाडलं. जमिनीवर पाडून तिला वारंवार लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या कृष्णवर्णीय अमेरिकन मुलींही हिंसा इथेच संपली नाही. तर यातल्या एका कृष्णवर्णीय अमेरिकन मुलीने तिच्या पायातली चप्पल काढत तिला चपलीने मारहाण करण्यास सुरूवात केली.

आणखी वाचा : Dancing Dadi : ‘लॉलीपॉप लागेलू…’, आजीही स्वतःला आवरू शकली नाही; पाहा VIRAL VIDEO

आणखी वाचा : VIRAL VIDEO : तुम्ही कधी हत्तीची अशी हेअर स्टाईल पाहिलीय का? आंघोळीसाठी ४५ हजार रूपयांचा घेतो स्पेशल शॉवर

या पीडित तरूणीने मदतीसाठी एका ट्रान्झिट अधिकाऱ्याकडे मदत मागितली तेव्हा पोलिसांनी प्रथम हल्ल्याची घटना नोंदवत तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. चारही संशयितांची ओळख कृष्णवर्णीय तरुणी असून त्या १३ ते १६ वयोगटातील आहेत.

हा वांशिकतेवर आधारित हल्ला होता असं फिलाडेल्फिया जिल्हा मुखत्यार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रात्री फिलाडेल्फिया जिल्हा मुखत्यार कार्यालयाने चार अल्पवयीन मुलींविरुद्ध गंभीर हल्ला, वांशिक धमकी, गुन्हेगारी कट, साधा हल्ला आणि इतर संबंधित गुन्ह्यांचे आरोप मंजूर केले आहेत. या घटनेत पिडीत तरूणीला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Black teens caught beating up asians in viral subway video philadelphia anti asian attack charges prp

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
ताज्या बातम्या