VIRAL VIDEO : तुम्ही कधी हत्तीची अशी हेअर स्टाईल पाहिलीय का? आंघोळीसाठी ४५ हजार रूपयांचा घेतो स्पेशल शॉवर

सोशल मीडियावर हत्तींचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण तुम्ही कधी असा हत्ती पाहिला आहे का ज्याने खास प्रकारची हेअर स्टाईल केली आहे. एक अनोखी हेअर स्टाईल असलेला गजराजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “हॅंडसम बॉय…”

Elephant-amazing-Hair-Style-viral-video
(Photo: Instagram/ findingtemples)

सोशल मीडियावर हत्तींचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. जंगलात राहणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये हत्ती हा सर्वात प्रेमळ, शांत आणि बुद्धिमान प्राणी मानला जातो. लोकांना हत्तीचा वेडपणा, त्यांचा कौटुंबिक स्वभाव प्रचंड आवडतो. पण, जर कोणी हत्तींना विनाकारण त्रास देत नसेल तर ते माणसांशीही खूप मैत्रीपूर्ण वागतात. हत्ती आणि मानव यांच्यातील घट्ट नाते दर्शवणारे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण तुम्ही कधी असा हत्ती पाहिला आहे का ज्याने खास प्रकारची हेअर स्टाईल केली आहे. एक अनोखी हेअर स्टाईल असलेला गजराजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माहूत त्यांच्या हत्तीचे केस कंगव्याने वाळवताना दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या याच हत्तीची जोरदार चर्चा सुरूय.

‘Findingtemples’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनोखी हेअरस्टाईल असलेला गजराजचा हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना खूपच आवडला आहे. या व्हायरल व्हिडीओमधल्या हत्तीची बॉब कट हेअर स्टाईल पाहण्यासारखी आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक हत्ती उभा आहे, ज्याच्या कपाळावर खूप लांब केस आहेत. एक माहूत या हत्तीच्या केसात अतिशय प्रेमाने कंगवा फिरवताना दिसून येत आहे आणि हत्ती सुद्धा एखाद्या लहान मुलासारखं शांत उभा राहून केस कापताना दिसून येत आहे. हत्ती अतिशय शांत उभा आहे आणि आरामात आपल्या डोक्यावरील हेअर स्टाईल करून घेत आहे. या हत्तीच्या कपाळावर एक लांब तिलक सुद्धा दिसून येतोय. मध्यभागी तुम्हाला दिसेल की जेव्हा माहुत कंगवा फिरवत असतो, तेव्हा हत्ती त्याच्या सोयीसाठी गुडघ्यावर बसतो, जेणेकरून माहुतला कंगवा फिरवताना कोणतीही अडचण येऊ नये. हा व्हिडीओ कोईम्बतूरच्या थेक्कमपट्टी गावातला आहे.

हत्तीची ही आगळीवेगळी हेअर स्टाईल सोशल मीडियावर चांगलीच गाजते आहे. या व्हायरल व्हिडीओमधल्या हत्तीचं नाव ‘सेनगामलम’ असं असून तो तमिळनाडूच्या मन्नारगुडी शहरातल्या राजागोपालास्वामी मंदिरात राहणारा आहे. हा हत्ती त्याच्या बॉबकटमुळे यापूर्वी सुद्धा प्रसिद्धीझोतात आला होता. त्याच्या या हेअर स्टाईलमुळे आता त्याचं नावच ‘बॉबकट सेनगामलम’ असं पडलं आहे. ‘बॉबकट सेनगामलम’ जेव्हा त्याच्या माहुताकडून आपली हेअर स्टाईल ठिकठाक करून घेतो त्यावेळचा हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय आणि तो सोशल मीडियावर व्हायरल देखील होऊ लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ७६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

आणखी वाचा : रात्री अपरात्री कारमधून आल्या चोर आंटी आणि काय चोरी केली पाहा…VIRAL VIDEO पाहून तुम्ही पोट धरून हसाल!

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : विद्या बालनच्या ‘लेझी लेड सैय्या’ गाण्यावर दोन मुलींचा डान्स VIDEO VIRAL, व्हिडीओला ५ मिलियन व्ह्यूज; तुम्ही पाहिलाय का?

हत्तीची आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेतात माहुत

या व्हायरल व्हिडीओमधला ‘सेनागमलम हत्ती’ २००३ मध्ये केरळमधून राजगोपालस्वामी मंदिरात आणण्यात आला होता. या हत्तीचा माहुत एस राजगोपालने त्याच्यासाठी अशी अनोखी हेअरस्टाइल तयार केली आहे. तो या हत्तीची विशेष काळजी घेतो. हत्तीला तो आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतो, असं या माहुताने सांगितलंय. एकदा त्याने इंटरनेटवर एक व्हिडीओ पाहिला होता ज्यामध्ये हत्तीची बॉब-कट हेअर स्टाईल होती. हत्तीची ही हेअर स्टाईल त्याला खूप आवडली होती. त्यानंतर त्याने आपल्या सेनागमलम हत्तीचे केसही वाढवण्यास सुरुवात केली आणि हत्तीला हा खास लूकही दिला.

असं म्हटलं जातं की, हत्तींच्या डोक्यावरील केस त्यांना हवेतील उष्णता वाहून नेण्यास मदत करतात. म्हणूनच उन्हाळ्यात या व्हायरल हत्तीसाठी तब्बल ४५ हजार रुपयांचा खास शॉवरही देण्यात येत असतो. लोक म्हणतात की या हत्तीला कायम बांधून ठेवले जात नाही.

या आगळ्यावेगऴ्या रुपामुळे या हत्तीचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी बॉब कट हेअर स्टाईल केलेल्या हत्तीवर प्रेमाचा वर्षाव सुरू केलाय. यावर प्रतिक्रिया देताना एका यूजरनं लिहिलं आहे की, या व्हिडीओमुळे आज खऱ्या अर्थाने माझा दिवस सुरू झालाय…”, तर दुसऱ्या यूजरनं ‘हँडसम बॉय…’ असं लिहित हत्तीचं कौतुक केलंय. आणखी एका दुसऱ्या युजरने लिहिलंय, “अतिशय प्रेमळ”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Elephant sengamalam bob cut hair combed by mahout people impressed by its amazing hairstyle watch viral video prp

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या