Trending UK Student Dance: सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात, ज्यामध्ये परदेशी लोक भारतीय गाण्यांवर थिरताना दिसतात. हे व्हिडीओ नेहमीच सर्व नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनतात आणि या व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओमध्ये काही विदेशी नागरिकांचा ग्रूप देसी ढोलाच्या तालावर थिरकाताना दिसून येतात. यावेळी डान्स करताना त्यांचा जोश पाहून तुम्हाला डान्स करण्याचा मोह आवरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ यूकेमधल्या एका महाविद्यालयातला आहे. या व्हिडीओची सुरुवात एका महाविद्यालयात एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने केलेल्या डान्सने होते. आपल्या संस्कृतीला श्रद्धांजली म्हणून विविध पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी त्याला घेरलेलं दिसून येत आहे. ढोल वाजवायला सुरुवात झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या देशाचे झेंडे घेऊन डान्स करू लागतात. प्रत्येक जण दिलखुलासपणे या सोहळ्यात डान्स करताना दिसून येत आहे.

आणखी वाचा : हा VIRAL VIDEO तुम्हाला बालपणीच्या आठवणीत घेऊन जाईल, एकाच छत्रीत मित्रांना एकत्र बघून तुम्हीही भारावून जाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Bill Gates Resume: बिल गेट्स यांनी ४८ वर्षांपूर्वीचा जुना बायोडाटा केला शेअर, नोकरी मिळवण्यासाठी पाहा काय लिहिलं?

देसी ढोलाच्या तालावर विदेश नागरिकांनी केलेल्या या डान्सचा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागला आहे. हा व्हिडीओ सनी हुंदल नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर तो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल देखील होऊ लागला. ‘आधुनिक ब्रिटेन’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला २.१ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. कुणी विदेशी विद्यार्थ्यांच्या डान्सचं कौतुक करताना दिसत आहेत, तर कुणी देसी ढोलचं कौतुक करत आहेत. देसी ढोल सुरू झाल्यावर तर डान्स करण्याचा मोह आवरणं अवघड असल्याचं काही युजर्सनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Britain student dancing on beats indian dhol video viral on social media prp
First published on: 04-07-2022 at 15:17 IST