ChatGPT Writes Tarak Mehta Ka Ooltah Chashma Latest Episode Jethalal Babita Iyer Story Goes Viral On Internet Fans Love It | Loksatta

जेव्हा ChatGPT तारक मेहता मालिकेचा एपिसोड लिहितं.. जेठालाल- बबिताची ‘ही’ भन्नाट स्टोरी होतेय व्हायरल

ChatGPT ने लिहिलेले एपिसोड काहींना एवढे आवडले की त्यांनी तारक मेहताच्या लेखकांना सुद्धा तुम्ही आता ही सिस्टीम वापरायला सुरु करा असा सल्ला दिला आहे.

ChatGPT Writes Tarak Mehta Ka Ooltah Chashma Latest Episode Jethalal Babita Iyer Story Goes Viral On Internet Fans Love It
जेव्हा ChatGPT तारक मेहता मालिकेचा एपिसोड लिहितं (फोटो:लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ChatGPT Writes TMKOC Episode: प्रसिद्ध हिंदी मालिका तारक मेहता का उलटा चष्माचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. वेगवेगळ्या फॅन पेजेसवरून जेठालाल, दया, भिडे, बबिता यांच्यावर मजेशीर मीम्स व्हायरल केले जात असतात. असाच एक मजेशीर पण अगदीच भन्नाट प्रकार सध्या फेसबुकवर व्हायरल झाला आहे. तुम्ही Chatgpt बद्दल ऐकून असाल हो ना? तुमच्या कोणत्याही प्रश्नावर, मागणीवर अगदी एखाद्या लेखकाप्रमाणे उत्तर देणारी ही नवी प्रणाली सध्या टेक जगतात चर्चेचा विषय आहे. कोणतीही नवीन सिस्टीम आली की सवयीने आपल्याकडची मंडळी त्यावर विचित्र प्रश्न शोधत असतात. अशाच टपू सेना अशा एका फेसबुक ग्रुपवरील एका मेम्बरने अलीकडे Chatgpt कडे तारक मेहता मालिकेचा एक एपिसोड लिहिण्याची मागणी केली. आणि मग जे उत्तर समोर आलं ते बघून तुम्हीही हैराण व्हाल.

साधारणतः मागील काही वर्षांपासून तारक मेहता मालिकेचे चाहतेच मालिकेचा दर्जा घसरत चालल्याची तक्रार करत आहेत. कॉमेडी मालिका आता फक्त सामाजिक संदेश देण्याचेच काम करते आणि विनोद कुठेतरी हरवत चालला आहे अशाही लोकांच्या तक्रारी असतात. त्यामुळे प्रत्येक कथानकाचा साचा हा एखादी समस्या मग त्यावर जेठालाल किंवा चंपकलालने दिलेले उत्तर मग कोणाचे तरी मनपरीवर्तन असा पाहायला मिळतो. ChatGpt ने सुद्धा हा पॅटर्न ओळखून एक भन्नाट कथानक फॅन्सना लिहून दिलं आहे.

Chatgpt ने लिहिला तारक मेहता मालिकेचा एपिसोड

जेठालाल- बबिताची Anniversary

हे ही वाचा<< २५ वर्षांपासून तारक मेहता फेम अभिनेत्रीचं कुटुंब डोंबिवलीत चालवतं दुकान; लहान बहीणही स्टार; Video केला शेअर

दरम्यान, आता एकदा हे फोटो व्हायरल झाल्यावर चाहत्यांनी एका मागोमाग एक अनेक सीन्सच्या कल्पना देऊन Chatgpt कडे एपिसोड लिहून देण्याची मागणी केली आहे. काहींना या प्रणालीने लिहिलेले एपिसोड एवढे आवडले की त्यांनी तारक मेहताच्या लेखकांना सुद्धा तुम्ही आता ही सिस्टीम वापरायला सुरु करा असा सल्ला दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 09:57 IST
Next Story
भावाला वाचवण्यासाठी चिमुकलीने तब्बल १७ तास… टर्कीमधला ‘तो’ फोटो होतोय व्हायरल