Jugaad for Cheating in Exam: परीक्षा जवळ आल्यावर मुलं अभ्यासाला लागतात. परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून कष्टाळू मुले अभ्यासासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. अनेक मुले असे असतात जे स्वत: आवडीने अभ्यास करतात तर काही मुले पालकांच्या भीतीने अभ्यास करतात जेणेकरून ते उत्तीर्ण होऊ शकतील. परंतु याशिवाय काही मुले अशी आहेत की, ज्यांना फक्त उत्तीर्ण व्हायचे आहे, परंतु अभ्यासासाठी कठोर परिश्रम करायचे नसतात. अशी कष्ट न करणारी मुलं अभ्यासापेक्षा ‘कॉपी’ न करून ते उत्तीर्ण कसे होतील यावर जास्त लक्ष केंद्रित करतात. आजकाल ‘कॉपी’ करणे ही काही सोपी गोष्ट नाही. परीक्षेत चांगले गूण मिळतील आणि शिक्षक त्यांना ‘कॉपी’ करताना पकडू नये यासाठी ही मुले ‘कॉपी’ करण्यासाठी नवीन कल्पना आणि युक्त्या शोधत असतात.

‘कॉपी’ करण्याची अशीच एक नवीन पद्धत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती पाहिल्यानंतर प्रत्येक शिक्षक आता १० आणि २० रुपयांच्या नोटांकडेही संशयाने पाहतील. तुम्ही म्हणाल असे का? त्याचे कारण म्हणजे एका विद्यार्थ्याने मुलाने ‘कॉपी’ करण्यासाठी जे काही केले आहे ते पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.

हेही वाचा – मरता मरता वाचला तरुण; जीममध्ये डोक्यात पडणार होता रॉड अन् तेवढ्यात…घटनेचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, विद्यार्थ्यांनी १० आणि २० रुपयांच्या नोटांसह पांढरा पेपर चिकटवला आहे, ज्यावर परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे त्यांनी नोटा अशा प्रकारे जोडल्या आहेत की पहिल्यांदा पाहिल्यानंतर कुणालाही संशय येणार नाही. नेहमी वापरल्या जाणाऱ्या नोटेप्रमाणेतचे ती दोन्ही बाजूने दिसते. पण जेव्हा नीट पाहिल्यावर लक्षात येते की त्या दोन नोटा आहेत. दोन्ही नोटांच्या एका आतल्या बाजूला कागज चिटकवून ‘कॉपी’ केली आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी करण्यासाठी वापरलेली नवी पद्धत पाहून शिक्षकही चक्रावले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओ पाहून लोक व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देत आहे.

हेही वाचा – “अशक्य असे काहीही नाही!”दिव्यांग तरुणीने केला जबरदस्त डान्स; व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर love.connection_ नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ३ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १७ लाख लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर लोक अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले – “मला आज पैशाची किंमत कळली.” दुसर्‍याने लिहिले- “नवीन ‘कॉपी’ मोड अॅक्टिव्ह झाला. तिसर्‍याने लिहिले,”शक्तिशाली लोकचं शक्तिशाली जुगाड करतात.”